*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:12 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात घडलेल्या घटनेने ऐतिहासीक आठवण करून दिली. 5 हजाराच्या जमावामध्ये पोलीस चारही बाजूने अडकले असतांना तो जमाव गावातील इतर वस्तीकडे जाणार नाही ही सर्वात मोठी जबाबदारी पार पाडतांना ही खिंड अत्यंत मेहनतीने आणि दृढ निश्चयाने लढवणारा सैनिक अर्थात पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांना बाजीप्रभु देशपांडे म्हणावे लागेल. बाजीप्रभु देशपांडे ऐतिहासीक व्यक्तीमत्व असले तरी आज 12 तारखेच्या घटनेला पाहुन साहेबराव नरवाडे यांनी घेतलेली मेहनत आज पुन्हा एकदा बाजी प्रभु देशपांडेचे नाव घेण्यासाठी योग्य वेळ आहे.
12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ देगलूर नाका परिसरात रजा चौक, ब7करत कॉम्प्लेक्स,देगलूर नाका आणि बाफना टी पॉईंट या चार रस्त्यांवर मोठा जमाव असतांना पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे चौकोनात आले. या जमावाला इतर वस्त्यांकडे जायचे होते. त्यांना रोखून धरणे ही मोठी जबाबदारी पोलीसांवर होती.
पोलीसांचे संख्याबळ आणि जमावाचे संख्याबळ यामध्ये खुप मोठी तफावत होती.थोडी फार शक्ती पोलीसांकडे होती ती त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांची आपल्याविरुध्द वारे वाहत असतांना आपल्यापेक्षा समाजाचे रक्षण हे महत्वपुर्ण आहे.ही बाब पोलीसांनी हेरली होती आणि त्याचा विरोध करतांना जामावाने केलेल्या दगडफेकीत सर्वसामान्य माणसे,पोलीस,66 पत्रकार जखमी झाले.जमावातील अनेक समाजकंटकांनी पोलीसांसमक्ष त्यांनाच मारा अशी आरडाओरड केली. यावेळी पोलीसांना स्वत:चे रक्षण तर करायचेच होते.पण हा जमाव इतर वस्तीकडे वळला नाही पाहिजे याची जबाबदारी सुध्दा पार पाडायची होती.
देगलूर नाका हा परिसर ईतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला आहे. या हद्दीचे रक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्यावर होती आणि आहे.
आपल्या हातात आपली कायदेशीर पिस्तुल घेवून त्यांनी सुरू केलेला आरडाओरड आणि जमावाकडे घेतलेली धाव खुप महत्वपूर्ण आहे. ते पळाले. त्यांच्यासोबत इतर पोलीस अंमलदार,पोलीस अधिकारी सुध्दा त्यांच्या हाकेला ओ देत धावले आणि समाजकंटकांनी पहिला लक्ष साहेबराव नरवाडे यांनाच केला आणि त्यांच्या उजव्या पायाला लागलेल्या दगडाने आणि पोटावर लागलेल्या दगडाने जोरदार वेदना दिल्या. आपल्या पायातून रक्त बाहेर येत आहे.त्यावेळी त्यांच्या सहकारी अंमलदाराने आपला हात रुमाल त्यांच्या पायावर बांधला तरीपण पोलीस निरिक्षक नरवाडे त्याच परिस्थितीमध्ये धावत राहिले आणि आपली जबाबदारी त्यांनी पुर्णच केली.आजही जखमी असतांना उपचार घेवून ते आपल्या पोलीस ठाण्याचे कामकाज करतच आहेत. या कृतीला पाहुन असे लिहावे वाटते की,लिख गया नारे कोई दिवार पर,भिडने पत्थर चलाएँ कार पर। चुप हो गये दरख्तोने कहॉं बस नहीं चलता नदी की धार पर। यावरून पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांना दोन्ही कर जोडून समाजात 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तांडवाला थांबवले यासाठी धन्यवाद म्हणावे लागेल.
ही घटना घडतांना अनेकांनी घेतलेले फोटो पाहिले तेंव्हा पोलीस अधिक्षकांच्या कानात कांही पोलीस अधिकारी बोलतांना दिसत आहेत. त्यांना तेवढेच येते कारण प्रत्यक्षात काम करणे आणि दाखवणे यात मोठे अंतर आहे.पोलीस अधिक्षकांच्या कानात बोलणाऱ्यांनी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी समस्या स्वत: तयार केल्या आणि त्याचे बिल इतरांच्या नावाने फाडले. पोलीस अधिक्षकांनी अशांची ओळख आपल्या विशेष डायरीमध्ये ठेवण्याची गरज आहे आणि म्हणूनच साहेबराव नरवाडे यांच्या मेहनतीची किंमत जास्त झाली आहे.
याच घटनेत अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्यासह असंख्य पोलीस अंमलदार जखमी झाले.त्यांना झालेली जखम सुध्दा तेवढ्याच किंमतीची आहे.जेवढी किंमत साहेबराव नरवाडे यांच्या जखमेला आहे. आजच्या परिस्थितीत भिती रस्त्यावर फिरत आहे आणि फिरण्यासाठी निघालेली भिती दिसते आहे.भिंतींंना सर्व कांही माहित आहे.पण याची माहिती त्या हल्लेखोराला नाही अशा या परिस्थितीत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केलेले काम दखल घेण्यासारखे आहे.आपली नजर आकाशात ठेवून एक उंच भरारी मारण्याची ताकत ठेवणाऱ्या सर्व पोलीसांनी त्या दिवशी घेतलेली मेहनत आणि त्यामुळेच नांदेड शहरात अत्यंत थोड्याशा घटनेत नियंत्रण आणले म्हणून पोलीसांविषयी असे म्हणायचे आहे की,रोज तुफान ढराते रहे फिरभी पंछी उडान पर जाते रहें या शब्दांप्रमाणे दररोजचे कामकाज आज नांदेडची जनता करत आहे.
घटना घडताच पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सुध्दा घटनास्थळी धाव घेतली आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपुस करून पुढील रणनिती ठरवली आणि त्यावर काम करत आजपर्यंत जवळपास 40 जणांना अटक केली आहे.समाजातील ज्या लोकांचे नुकसान या दंगलखोरांनी केले आहे ते नुकसान भरपाई करून घेण्याची कार्यवाही सुध्दा पोलीस करणार आहेत.
एकंदरीतच माती ओली असतांना त्यात प्रेमाच्या बिजाचे रोपण होणे आवश्यक आहे. मातीतील पाणी सुकले तर ती माती दगड होते आणि त्यावेळी त्यात कोणत्याही बिजाचे रोपण होत नाही याची जाणिव ठेवून समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले आचरण ठेवण्याची गरज आहे.