*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.15.जिल्यातील अर्धापूर नगरपंचायत निवडणुकी साठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व अधिनियमातील तरतुदींचे तंतोतंत पालन होण्याच्या दृष्टीने नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवताना झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी १२ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेले अर्धापूर नगर पंचायतीची आरक्षण सोडत रद्द केली होती.
आज दि.१५ सोमवारी रोजी नव्याने आरक्षण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उज्वला पांगरकर, नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी अब्दुल रहमान परवेझ हुसेनी या बालकांच्या हस्ते चिट्टी काढून आरक्षण सोडत काढली. तीन वार्डात अंशतः बदल होऊन बाकीचे जैसे थे आरक्षण राहीले आहे.
अर्धापूर नगरपंचायतचे एकूण १७ सदस्य असून एस.सी च्या दोन वार्डाचे आरक्षण कायम,ओबीसी महिला दोन, ओबीसी पुरूष दोन व सर्वसाधारण महिला सहा याच बरोबर इतर पाच असे एकूण १५ जागेचे आरक्षण सोडत काढण्यात आली असून काही प्रमाणात बदल झाला आहे. दि.१२ रोजी आरक्षण जाहीर होताच अनेकांचे स्वप्न भंगले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिनियमानुसार पुन्हा काही वार्डातील आरक्षणात अंशतः बदल झाल्याने काही उमेदवारांना दि.१५ रोजी सोडतीत दिलासा मिळाला असल्याने इच्छुक कार्यकर्ते पुन्हा निवडणूकीच्या मैदानात आले.यावेळी आरक्षण सोडत कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे,शहराध्यक्ष राजेश्वर शेटे,उपनगराध्यक्ष प्र.डॉ.विशाल लंगडे,आर.आर. देशमुख,सोनाजी सरोदे, नगरसेवक मुस्वीर खतीब, शिवसेना शहर प्रमुख सचिन येवले,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप राऊत,राष्ट्रवादीचे प्रभारी ओमप्रकाश पत्रे,शेख साबेर,मुनिरभाई तांबोळी,भाजपा उपाध्यक्ष प्रल्हाद माटे,नगरसेवक शिवराज जाधव,तुकाराम साखरे,उमाकांत सरोदे,प्रसाद सिनगारे,रमाकांत राऊत,सुरेश डक,गजानन माटे,भाजपा शहराध्यक्ष विलास साबळे,योगेश हाळदे, वंचितचे समीउल्ला बेग,आनंद सिनगारे, एम.आय.एमचे तालुकाध्यक्ष महम्मद शकिल,नगरसेवक नामदेव सरोदे,शेख अलिम, व्यंकटी राऊत,छत्रपती कानोडे,अशोक डांगे,मारोती बारसे,गोविंद माटे,राहूल हट्टेकर,पप्पू साखरे,मारोती बारसे,शुभम साखरे,
अबूजर बेग,शेख शाकेर,शेख मकसूद,काझी सल्लाउदिन,शेख रफीक,बबनराव लोखंडे,तुकाराम माटे आदींसह अनेक इच्छूक उमेदवार यावेळी उपस्थित होते.
*अर्धापूर नगरपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे*
वार्ड १-(ओबीसी पुरुष)ना.मा.प्र
वार्ड २-सर्वसाधारण.
वार्ड ३- सर्वसाधारण.
वार्ड ४-सर्वसाधारण महिला.
वार्ड ५-सर्वसाधारण महिला.
वार्ड ६-सर्वसाधारण.
वार्ड ७-ओबीसी पुरुष.
वार्ड ८-सर्वसाधारण महिला
वार्ड ९-ओबीसी महिला.
वार्ड १०- सर्वसाधारण.
वार्ड ११- सर्वसाधारण महिला.
वार्ड १२-सर्वसाधारण महिला.
वार्ड १३-सर्वसाधारण.
वार्ड १४- अनुसूचित जाती महिला.
वार्ड १५- सर्वसाधारण महिला.
वार्ड १६ -ओबीसी महिला.
वार्ड १७-अनुसूचित जाती.
आरक्षण सोडत यशस्वी करण्यासाठी बांधकाम अभियंता नागनाथ देशमुख,अधिक्षक मदनकिशोर डाके,आनंद मोरे,तलाठी रमेश गिरी,कैलास गायकवाड,परवेज हुसेनी, शिवाजी कांबळे,विजय गंधनवाड यांनी परिश्रम घेतले.
*अनेकांची स्वप्ने भंगली!*
सोमवारी नगरपंचायत आरक्षण सोडत झाली असून काही ठिकाणी इच्छुकांच्या अपेक्षा भंग झाल्या असल्याने अनेकांची स्वप्ने भंगली असून,कहीं खुशी कहीं गमचे वातावरण निर्माण झाले आहे.