KINWATTODAYSNEWS

CIBIL (सिबिल) म्हणजे काय याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती..

माझ्या महाराष्ट्रातील तमाम नोकरदार वर्ग, भांडवलदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार ,ग्रहणी, तसेच माझ्या बंधू व भगिनींनो आज आपण एक जिव्हाळ्याचा व अत्यंत गरजेचा विषय यावर आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण आपल्या स्वतःच्या कमाई मधून आपल्या गरजा भागवू शकत नाही त्यावेळेस आपण इतरांवर अवलंबून असतो म्हणजेच आपल्या कमाईच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीकडून, संस्थेकडून आपण कर्ज घेत असतो त्या कर्जाच्या स्वरूपात आपण त्यांना “व्याज” देत असतो म्हणजे मानवी जीवनाचे आर्थिक चक्र गतिमान व्हावे मानवी जीवन हे आनंदमय सुखमय होवो यासाठीच हा एक आर्थिक व्यवहार हा भाग निर्माण झालेला आहे या आर्थिक व्यवहाराचे जतन किंबहुना आता पेक्षाही जास्त सुरक्षित आर्थिक व्यवहार किंबहुना अर्थ नियोजन आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीसाठी द्यायचा आहे किंबहुना प्रदान करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी आजपासूनच मानवा मानवातील परस्पर आर्थिक व्यवहार हे चांगले राहिले पाहिजेत यासाठी आपल्या सर्व नागरिकांना आर्थिक व्यवहार परस्पर आर्थिक व्यवहार हे चांगले राहावे यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून या आर्थिक व्यवहाराची अंमलबजावणी किंबहूना व्यवहार कसे यासाठी कंपनी निर्माण केली एक संस्था निर्माण केली या संस्थेमार्फत या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतल्या जाते म्हणजेच आर्थिक व्यवहार मानवा मानवा तील किंवा ग्राहक व कंपनी या मधील व्यवहार कसे चालू आहेत याबद्दल माहिती मिळत असते त्याचा डाटा तयार करत असते यालाच आपण CIBILअसं म्हणत असतो. मित्रांनो भारतामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत ज्या या ग्राहक व म्हणजे ऋणको व धनको यांच्यातील परस्पर संबंधाचा डाटा म्हणजे त्यांचा इतिहास हा लिहून ठेवत असते या इतिहासालाच आपण सिबिल रिपोर्ट असं म्हणावं.

तुम्हाला माहीत आहे का CIBIL Score म्हणजे काय? जेव्हा मनुष्य त्याचा गरजा ह्या त्याने कमावलेल्या पैश्यान मधुन पूर्ण नाही करू शकत. तेव्हा तो या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक वर अवलंबून राहतो. तिथून तो लोण घेतो आणि प्रत्येक महिन्याला तो त्याचा EMI भरतो. परंतु कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था तुम्हाला तसे लोण देत नाही.

तुम्हाला लोण देण्याआधी बँक तुमचे वित्तीय व्यवहार तपासते आणि त्या वित्तीय व्यवहारा वर तुम्हाला लोण मिळेल किंवा नाही हे अवलंबून राहते. जर तुम्ही हा विचार करत असाल की मला लोण का नाही मिळणार.

तुम्हाला लोण मिळणार की नाही हे तुमच्या CIBIL Score वर अवलंबून राहते. याच CIBIL Score मुळे बँक ला महिती होते की तुम्हाला किती लोण द्यायचे की जे तुम्ही परत करू शकणार.

तर चला माहिती करून घेऊ की CIBIL Score म्हणजे काय? आणि याचा अर्थ काय आहे? लोण घेण्यासाठी सिबील स्कोअर का महत्त्वाचा आहे? आणि तो कसा चेक करायचा?

CIBIL ही एक Credit Score देणारी कपनी आहे. जे RBI च्या देखरेख खाली काम करते व RBI च्या नियमांचे पालन करते. हे संस्था 2000 साली चालु करण्यात आली या कंपनी चे Head office मुंबई मध्ये आहे.

ही कंपनी भारतातील सर्व वित्तीय संस्थेला जोडलेली आहे. ही कंपनी दर वर्षी आपला डेटा बेस update करते. Credit information act 2005 च्या नियमांखाली ही कंपनी काम करते.

भारतात या तीन मोठ्या Credit Score चेक करनाऱ्या कंपनी आहेत.

1) EQUIFAX (या कंपनीची सुरवात 2010 मध्ये झाली.)

2) EXPERIAN (या कंपनीची सुरवात 2006 मध्ये झाली.)

3) CIBIL (ही खूप जुनी कंपनी आहे. या कंपनीची सुरवात 2000 साली झाली.)

तुम्ही जर बँक मध्ये लोण घ्यायला गेले, तर ते बँक तुमचा Credit Score थोड्याच मिनिटात चेक करतात. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सर्व बँक अकाऊंट ला जोडले गेले आहेत. पॅन कार्ड वरून तुमचा CIBIL Credit Score report तयार होतो.

या रिपोर्टनुसार त्यांनाच लोण मिळेल, ज्यांचा Score 750 च्या वर राहतो. तर तुमचा Score तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता. या करिता तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी काळजी पूर्वक कराव्या लागतील

तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणत्याही CIBIL Score च्या वेबसाईटवर जायचं आहे.

2) त्या नंतर तिथे एक फॉर्म येईल. त्यात काही माहिती भरायची आहे. जसे तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, पत्ता, मोबाईल नंबर, इत्यादी. (यामध्ये पॅन कार्ड ची माहिती देणे अनिवार्य आहे.)

3) या नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार. तुम्ही कधी कोणते लोण घेतले का? सर्व माहिती दिल्यावर थोड्याच वेळात तुमचा Credit report तुम्हाला दिसून जाणार. सिबिल रिपोर्ट मुळे अर्थव्यवस्थेला उभारी तर देता येऊ शकते परंतु मानवी जीवनाचा विकास पवित्र साधनाच्या माध्यमातून करता येतो.

4) तुम्ही तुमच्या जवळपास च्या बँक मध्ये जाऊन तुमचा credit score पाहू शकता. याचे ती बँक काही पैसे घेऊ शकते.

बँकांनी credit score ची रेंज ही 300 पासून ते 900 पर्यंत ठेवली आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर हा 300 असेल, तर हा चांगला स्कोर नाही किंवा 600 असेल, तर हा खूप चांगला स्कोर आहे असं काहीच नाही. याच महत्त्व वेग वेगळ आहे.
यावरून तुम्ही समजू शकता की जेवढा तुमचा सिबील स्कोअर चांगला असेल तेवढाच तुमच्यासाठी चांगलं आहे. सर्व वित्तिय संस्था त्यांची लोण संबंधित सर्व माहिती CIBIL जवळ सामायिक करतात. म्हणून तुमचा क्रेडिट रिपोर्ट कुठेही सारखाच येईल.

1) तुमचा क्रेडिट स्कोअर 300 च्या खाली असेल, तर बँक या गोष्टी ला अधिक असुरक्षित समजतात. तुमचा क्रेडिट स्कोअर एवढा असेल, तर तुम्हाला बँक कोणत्याच प्रकारचे लोण देत नाही.

2) 450 ते 600 चा क्रेडिट स्कोअर असेल, तर बँक याला एक सामान्य क्रेडिट स्कोअर समजतात. हो या स्कोअर मध्ये तुम्हाला लोण मिळण्याचे चान्स जास्त परंतु कमी लोण मिळेल. हा थोडा चांगला स्कोअर मानला जातो.

3) जर तुम्ही तुमचे लोण वेळे वर परत करता. तर बँक तुम्हाला 600 ते 900 अशा स्कोअर मध्ये ठेवते. या स्कोअर नुसार बँक तुम्हाला लोण जास्त देईल सोबतच व्याजा मध्ये काही सूट सुद्धा देऊ शकते. या करिता तुम्हाला तुमचे लोण वेळे वर परत करणे गरजेचे आहे.

4) तुम्ही घेतलेले लोण वेळेवर भरा. लोण ची EMI वेळेच्या आधी भरायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढी late EMI भरणार तेवढा तुमचा Credit Score खराब होत जाणार.

बँक च्या लोण वर अवलंबून राहणे कमी करा. जेव्हा अति आवश्यकता असेल तेव्हाच लोण घ्या आणि ते वेळेत परत करा.

3) तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरात असाल, तर एकच क्रेडिट कार्ड वापरा. काही लोक क्रेडिट कार्ड वर व्यवहार करतात. असे व्यवहार करणे टाळा. क्रेडिट कार्ड चा चुकीचा व्यवहार तुमचा Credit Score कमी करू शकतो.

4) एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे बिल वेळेवर भरा.

5) काही लोक बँक वर खूप विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की आपले व्यवहार बँक सोबत चांगले आहेत. परंतु अस करू नका. आपले व्यवहार स्वतः तपासून पहा. बँक कर्मचारी तुमचे पैसे व्यवस्थित भरत आहे. यामध्ये काही त्रुटी आहे का ते तपासा. Credit report चेक करत रहा. त्या मध्ये आलेल्या त्रुटी दूर करत चला.

6) एका पेक्षा जास्त लोण एक वेळेस घेऊ नका.

7) सर्व लोण व्यवस्थित settled करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला NOC मिळेल. जे तुमच्या कडे लोण संपूर्ण Nil केल्याचे proof राहील.

8) गरजे पेक्षा जास्त लोण घेऊ नका. आपल्याला जेवढ्या लोण ची गरज आहे तेवढाच लोण घ्या.

9) लोण व्यवस्थित परत करण्यासाठी long term लोण घ्या. ज्यामुळे तुमची EMI कमी येईल. ज्यामुळे तुम्हाला भरतांना काही अडचण येणार नाही. (लक्षात ठेवा लॉंग टर्म लोण मध्ये व्याज जास्त जाणार

CIBIL Score तुमच्या मागच्या व्यवहारावर अवलंबुन असतो. चला तर बघूया की CIBIL Score कसा तयार करतात.

1) मागील वित्तीय व्यवहार
तुमचा मागचा वित्तीय व्यवहार म्हणजेच तुम्ही आधी घेतलेले लोण कशा प्रकारे परत केले, किती दिवसात परत केले, तुमचा लोन परत करण्याचा ग्राफ कसा होता. या सर्व गोष्टी पाहिल्या जातात.

एका पेक्षा जास्त लोण घेऊन त्यावर अवलंबून राहणे
अस तर नाही, की तुम्ही फक्त लोण वर अवलंबून राहत आहे. Home loan, Car Loan आणि सोबतच तुम्ही क्रेडिट कार्ड चा सुद्धा वापर करता. या व्यतिरिक्त आणखी लोण तुम्ही बँक कडून घेतले आहेत. CIBIL Score ठरवताना हे सर्व बघितले जाते व यानुसार तुमचा Credit Score ठरतो.
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आपला सिबिल स्कोर चांगला राहू देणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी असते कारण आर्थिक व्यवहार हा मानवाच्या जीवनाला संजीवनी देत असतो हा संजीवनी मंत्र आपल्याला मानवा चा विकास घडवून आणण्यासाठी मदत करतो म्हणूनच मित्रांनो या पिढीने त्यांचा स्वतःचा सिबिल रिपोर्ट जर चांगला राव दिला तर येणाऱ्या पिढीला खूपच सुरक्षित भारत महासत्ता असलेला भारत पाहण्यास मिळणार हे मात्र खरे अजून याचे पुढे जाऊन या लेखा मार्फत लेखकाने सरळ सोप्या भाषेमध्ये आर्थिक व्यवहारा बद्दलची नैतिकता किंबहुना जागृकता यासाठीच म्हणजे काय समोर मानलेली आहे ज्यावेळेस वाचक हा या जागृतीचे स्त्रोत्र होईल त्यावेळेस या लेखाचा परमपूज्य उद्देश साध्य झाला असे समजण्यात येईल.
:- विलास संभाजी सूर्यवंशी किनवट ता. किनवट जि. नांदेड
मो.9922910080

247 Views
बातमी शेअर करा