*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.11.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.
नायगाव तालुक्यातील नायगाव ग्रामीण रुग्णालय,कुंटुर प्राथमिक आरोग्य केंद्र,बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र,व नायगाव तालुक्यातील कृष्णूर,घुंगराळा,आंतरगाव, कहाळा,सोमठाणा,राहेर,देगाव यागावांसह नायगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,व नायगाव तालुक्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र यांना याठिकाणी लागणारे वैदयकीय उपकरणे, फर्निचर,बेड,रुग्णांच्या तापासणीकरिता लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन आरोग्य विभागाने पुरवाव्यात अशी मागणी वसंत सुगावे पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.
तसेच बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थान बांधकामास मंजुरी देऊन निधी देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली.
यावर आरोग्यमंत्री मा. ना.राजेशभैया टोपे यांनी संबंधित विभागाना निर्देश देऊन कामे मार्गी लावू असे सांगितले.