नांदेड/प्रतिनिधी: मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते तथा आंबिका विद्यालयाचे संचालक काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते कै .सुरेशरावजी मरपळीकर यांच्या दुःखद निधनामुळे मरपळीकर परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखाच्या डोंगरातून समस्त मरपळीकर परिवार व यांची पत्नी भारतीबाई मरपळीकर आणि यांच्या चार मुली यांचे सांत्वन करण्या करिता काँग्रेस पक्षाचे माजी पालकमंत्री डी पी सावंत यांनी आले व असेही म्हणाले की मातंग समाजातील एक कोहिनूर हिरा समाजातून व काँग्रेस पक्षातून अचानकपणे निघून गेल्यामुळे खूप मोठी हानी झाली आहे
कै.सुरेशरावजी मरपळीकर यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि मरपळीकर यांच्या परीवाराला या खूप मोठ्या दुःखाच्या डोंगरातुन सावरण्याची शक्ती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी यांच्या सोबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्थायिक समिती सभापती सरदार विरेंद्रसिंघ गाडीवाले ,माजी उपमहापौर आनंद चव्हाण ,समाज भूषण शंकररावजी वाघमारे , माजी सभापती अमितसिंह तेहरा , शशिकांत तादलापुरकर, भालचंद्र पवळे ,सुधाकर जोगदंड ,सोपान वाघमारे ,बाबु वाघमारे ,विलास जाधव, व समस्त काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते
कै.सुरेशरावजी मरपळीकर यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या परिवाराचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी केले सांत्वन
456 Views