किनवट ता.प्र दि ११ मौजे धामनदारीच्या सरपंच पदी पुन्हा एकदा सौ जिजाबाई आत्राम ह्या मा. उच्च न्यायालय औरंगाबाद च्या निर्णयाव्दारे विराजमान झाल्याने त्यांना आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पदभार देण्यात आला त्यामुळे राष्ट्रवादी क़ॉग्रेस पक्षाच्या गोटात उत्साह संचारला आहे. तर त्यांच्या पदभार स्विकारतांना धामनदारी नागोराव नाईक, अनिल नाईक, प्रेमसिंग राठोड, दिलिप जाधव, विकास नाईक, महाविर आडे, सुदर्शन भालेराव, भावराव जाधव, पांडुरंग आडे, साहेबराव जाधव, पंडीत कुमरे, प्रफुल्ल राठोड, संतोष मनसे, परशराम आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. तर दिनांक ०९ नोव्हेबर २०२१ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांनी काढलेल्या एका पत्राव्दारे त्यांची फेरनिवड झाल्याचे समजले असुन त्या अणुषंगाने आज त्यांना पदभार देण्यात आला तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामुळे एका आदिवासी महिला सरपंचाला न्याय देता आला अशी प्रतिक्रीय यावेळी बोलतांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष व डोंगरी विभाग विकास समितीचे अशासकीय सदस्य राहुल गेमसिंग नाईक यांनी सांगितले तर राहुल गेमसिंग नाईक यांचे मुळगाव मौजे धामनदरी असल्याने या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.
तालुक्यातील दोन राजकिय ध्रुव असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजप च्या दोन वर्षा नंतरच्या विजनवासानंतर मुळ सत्ता संघर्षाला प्रारंभ झाला असुन या राजकिय आतिषबाजीचे फटाके आता फुटु लागले आहे. किनवट तालुक्यातील धामनदारी या ग्राम पंचायत मध्ये भाजपा प्रणित आघाडीच्या महिला सरपंच थेट निवडणुकीतुन विजयी झाल्या परंतु सहकार्या सोबत सत्ता वाटुन घेण्यात झालेल्या नाराजीचे फलित असे झाले कि त्यांना त्यांच्याच आघाडीच्या सहकार्यानी पदावरुन उतरवण्याकरिता षडयंत्र रचायला सुरवात केली व त्यांच्या विरुध्द अविश्वास ठराव वेगवेगळ्या ठीकाणावरुन आणण्यात सुरवात केली. पहिल्यांदा अविश्वास ठराव हा तहसिलदार यांच्या दालणात यशस्वी ठरला तर त्यास जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालणात आव्हाण दिल्या नंतर दुसरा असिश्वास ठराव हा फेरमतदान घेऊन घेण्यात आला त्यात हि भाजप गटातील सदस्यांना यश प्राप्त झाले. यानंतर मात्र येथे तालुक्यातील पुढा-यांची या प्रकरणामध्ये इंट्री झाली व दोन्ही पक्षातील मातब्बर नेत्यांनी या प्रकरणाला प्रतिष्ठेचे केले.
दरम्यान च्या काळात धामनदरीच्या थेट महिला सरपंच ह्या सौ. जिजाबाई परशराम आत्राम ह्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या गोटात सहभागी झाल्याने त्यांना राजकिय संरक्षण प्राप्त झाले. धामनदारी ग्राम पंचायत ते नांदेड जिल्हाधिकारी दालणात दावे प्रतिदावे व अर्ज , तक्रारी दाखल झाल्या नंतर शेवटी हे प्रकरण मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या दालणात गेले, तेथुन दिनांक २६ ऑक्टोबंर २०२१ रोजी लोकनियुक्त सरपंच सौ. जिजाबाई परशराम आत्राम यांच्या बाजुने निकाल लागल्याने राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाच्या गटात उत्साह संचारला असुन माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मतदारसंघातील संचारामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला अच्छे दिन आले असुन मा. आ. नाईक यांचे पायगुण असल्याचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडुन बोलले जात आहे.
भाजपाच्या गटातुन विजयी होऊन राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाच्या गटात सहभागी झालेल्या सौ जिजाबाई परशराम आत्राम यांचे सरपंच पद कायम रहावे या करीता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दिनकर दहिफळे, समाधान जाधव, प्रविण म्याकलवार, राहुल नाईक, अंबाडी तांडा चे सरपंच प्रेमसिंग जाधव, गुलाब जाधव यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती.
मौजे धामनदारीच्या सरपंच पदी पुन्हा एकदा सौ जिजाबाई आत्राम ह्या मा. उच्च न्यायालय औरंगाबाद च्या निर्णयाव्दारे विराजमान
577 Views