KINWATTODAYSNEWS

डोंगरगाव (चि)ता.किनवट जि.नांदेड येथे दिवाळी निमित्त आदिवासी कलावंतांचे भव्य लावनी कला मोहोत्सव (स्पर्धा) उत्साहात साजरा

किनवट/प्रतिनिधी:
दि. ०६ नोव्हेंबर २०२१ रोज शनिवार मौजे डोंगरगाव (चि) ता. किनवट जि. नांदेड येथे दिपवाळी सना निमित्त आदिवासी कलावंतांचे भव्य लावनी कला मोहोत्सव (स्पर्धा) कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून भगवान दादा हुरदुके अध्यक्ष :-प्रकल्प स्तरिय आढाव समिती किनवट,सुरेश पाटील सोळंके ( अध्यक्ष :- किनवट शहर कॉंग्रेस कमिटी), खंडेराव मोदे साहेब (माजी. सभापती पं. स. किनवट) प्रतापसिंग पडवाळ (चेअरमन) माधवराव डोखळे (सदस्य :-प.स.किनवट )विठ्ठल पाटील तिडके (पो.पाटील सावरी) प्रेमसिंग साबळे ( अध्यक्ष :- तंटामुक्ती समिती डोंगरगाव) गोपीनाथराव केंद्रे (मा.सरपंच पिंपरी) रमेश हुरदुके (पो.पाटील डोंगरगाव) मारोतराव सोळंके पाटील डोंगरगाव. करतारसिंग साबळे समन्वयक खासदार , गणेश आडे (उपसरपंच धानोरा तांडा),तुकाराम कोकाटे (सरपंच माळकोल्हारी) तारूसिंग पडवाळ ग्रा. प.सदस्य डोंगरगाव , विश्वनाथ शेळके (सरपंच डोंगरगाव) शिवाजी हुरदुके (उपसरपंच डोंगरगाव) शिवदास धुमाळे (सरपंच डोंगरगाव) तुकाराम साबळे (उपसरपंच डोंगरगाव) इत्यादींची उपस्थिती होती.

तसेच प्रथम क्रमांक बक्षीस ५००१ रुपये गजानन केशव तोडसाम (यवतमाळ ) द्वितीय क्रमांक बक्षीस ३००१ रुपये , प्रविण दत्ता नखाते (बोरी वन) तृतीय क्रमांक बक्षीस २००१ रुपये कु. प्रनिता कोंडबा वानोळे( कुपटी बु) यांच्या सह एकुन १४ आदिवासी कलावंतांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण करुन प्रमाणात भगवान हुरदुके यांच्या हस्ते देण्यात आले , गावकरी मंडळी सह परीसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून नरेश बोंबले (उत्कृष्ट लावनी डॅन्सर जलधारा),कोंडबाजी वानोळे (सरपंच कुपटी बु),सय्यद नबीसाब, सतिश मेंढे , सय्यद फिरोज, बालाजी भुरके वनरक्षक , युवराज हुरदुके (लावनी डॅन्सर डोंगरगाव)हे होते.

सदरील कार्यक्रमाचे आयोजक गजानन सोळंके पाटील, गजानन वागतकर, परमेश्वर मेंढे,यज्ञवल वावधने,सुरेश बुरकुले, नारायण वावधने, उतम खुडे, दसवेदाश हुरदुके, नागोराव मेटकर. यांनी केले होते.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निळकंठ शेळके (ग्रामीण कवी डोंगरगावकर)यांनी केले.

826 Views
बातमी शेअर करा