उ.प्रदेश खिरी लखिमपुर येथे शांतीपुर्वक सुरु असलेल्या शेतकऱ्यांनावर गाडी टाकून निर्दयीपने चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांनाची कलश याञा किनवट तालुक्यात फिरणार असुन या कलश याञेचे दर्शन घेण्यासाठी शेतकरी, कामगार, युवकांनी सहभाग घेण्याचे अव्हाण किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी केले आहे.
सदर शेतकरी कलश याञा देशभरात सुरु असुन, महाराष्ट्र हि याञा पुण्याहून महात्मा फुले यांना अभिवादन करुन सुरु झाली आहे.
गेली ११ महिण्यापासुन शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमानांवर सुरु असून, आता पर्यंत ६५० पेक्षा जास्त शेतकरी या समग्र आंदोलनात शहीद झाले आहे , हामी भावाचा केद्रिंय कायदा झाला पाहिजे, तिन काळे शेती कायदे रद्द झाले पाहिजे या मागण्यासाठी शेतकरी आंदोलन करत असुन हा शेतकरी लढा शेती-मातीसाठी आहे असे मत यावेळी काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले. शेतकरी कलश याञा किनवट तालुक्यात ९ नोव्हेबंर ,मंगळवारी इस्लापुर येथुन सुरूवात होणार आहे ,सकाळी १०.३० वा इस्लापुर येथून सुरु होऊन अभिवादन सभा आणि अस्थी कलश दर्शन होईल, सकाळी ११.३० शिवणी येथे अभिवादन सभा होऊन,दुपारी १.३० वा.बोधडी, दुपारी २.३० किनवट शहरात तहसिल मैदान येथे अभिवादन सभा आणि अस्थी कलश दर्शन होईल, सांयकाळी ४ वाजता शेतकरी कलश याञा सारखाणी येथे अभिवादन सभा आणि दर्शन होऊन हि याञा यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश करणार आहे,तेव्हा सर्व शेतकरी बंधुनी ,शेतकऱ्यांच्या तरुन मुलांनी शेतकऱ्यांना हक्कासाठी प्राण दिलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी कलश चे दर्शन घेण्यासाठी उपस्थित रहाण्याचे अव्हाण संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतिने काॅ.शंकर सिडाम,काॅ.किशोर पवार, काॅ.प्रभाकर बोड्डेवार,काॅ.खंडेराव कानडे, काॅ.आनंद लव्हाळे,काॅ.शेषराव ढोले, काॅ.कपिल जाधव, काॅ.दिलीप तुमलावाड,काॅ.स्टॅलिन आडे,काॅ.अनिल आडे,काॅ.मनोहर नाईक, मधुकर राठोड, दिलीप जाधव, नारायण चोपलवाड,इरफान पठाण,ब्रम्हा अकुलवार, राम कंडेल, साई राठोड,यल्लया कोतलगाम आदिनी केले अाहे.
शेतकरी कलश याञा दर्शन घेण्यासाठी सहभागी होण्याचे अव्हाण *शेती-मातीसाठी शेतकरी आंदोलन- काॅ.अर्जुन आडे
99 Views