KINWATTODAYSNEWS

एसटी कामगारांच्या आंदोलनाला आमदार केराम यांचा पाठिंबा

किनवट /प्रतिनिधी- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा,या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या ४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.रविवारी ( दि.३१) संपाच्या ठिकाणी आमदार भीमराव केराम यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
यावेळी संपकऱ्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे,राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते अदा करावेत,किनवट आगार आदिवासी आगार असूनसुद्धा आदिवासी भत्ता २००८च्या बेसीकवर मिळतो,तो २०२१ च्या बेसीकवर देण्यात यावा,आदी मागण्या आ.केराम यांच्याकडे केल्या. यावेळी मार्गदर्शन करताना आ.केराम म्हणाले की,एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सनदशीर मार्गाने संप पुकारला आहे. सदर आंदोलन शांततेत, लोकशाही मार्गाने सुरू ठेवावे. कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडू नये. मी व माझा भारतीय जनता पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे,सदैव राहू, अशी ग्वाही दिली.एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या निकाली काढण्याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविणार आहे. मागण्यांच्या पूर्णत्वासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करु,अशी ग्वाही केराम यांनी दिले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार,बाळकृष्ण कदम उपस्थित होते.

176 Views
बातमी शेअर करा