KINWATTODAYSNEWS

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगाच्या न्यायहक्कासाठी ठिय्या आंदोलन दिनांक 17 नोव्हेंबर 2021रोजी करणार

किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील दिव्यांगा संबंधीच्या समस्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दिव्यांग बांधवाच्या अनेक समस्या जशाच्या तशा असून निवेदनासोबत दिलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 17 नोव्हेंबर रोजी सर्व दिव्यांगांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

यावर भगवान गंगाराम मारपवार, दिनेश जयस्वाल, निरंजन राठोड ,फिरोज भाई मतीन चाऊस, दशरथ आंबेकर, मलकाबाई सिद्धेवाड, शेख मुजीब, दशरथ चव्हाण, बालाजी बटूर, अब्दुल सलीम, शहाबुद्दीन बडगुजर, गोविंद वाकोडे, लक्ष्मण बोलेनवार, विनोद वाठोरे, धीरज राठोड आधीच्या स्वाक्षरी आहेत.

362 Views
बातमी शेअर करा