दिनांक 19 आक्टो. 2021 रोजी दादर येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत ठरलेल्या धोरणानुसार राज्य परिवहन विभाग किनवट गेटसमोर संयुक्त कृती समितीचे सदस्य अमरण उपोषणास बसले आहेत.
राज्य परिवहन महामंडळातील प्रलंबित व थकित महागाई भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के घरभाडे भत्ता 8, 16, 24 प्रशासनाकडून मान्य केल्याप्रमाणे तसेच नियोजित तारखेस वेतन अदा करावेत व थकबाकी रकमेचे दिवाळीपूर्वी रक्कम अदा करावी. यासाठी दिनांक 27 ऑक्टोंबर 2021 रोजी राज्यभर संयुक्त कृती समिती द्वारे आमरण उपोषणास सुरुवात झाली असून असून याचाच एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळ किनवट आगारात गेटसमोर दिनांक 28 आक्टो. 2021रोजी पासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र एस.टी कामगार संघटना किनवट आगार अध्यक्ष आर.आर. नेमानीवार, सचिव डी.जी. कोंडे, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस किनवट चे अध्यक्ष चे एन बी आंगरवार, सचिव जीआर सटलावार,महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक किनवट आगाराचे सचिव महादळे, महाराष्ट्र एस टी कामगार सेना किनवटचे अध्यक्ष जी एस चंद्रे, सचिव जी व्ही दासरवार, कास्ट्राईब राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटना किनवटचे एस डी वाघमारे सचिव शिशिर चव्हाण व आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
राज्य परिवहन महामंडळ किनवट आगारात गेटसमोर दिनांक 28 आक्टो. 2021रोजी पासून आमरण उपोषण
124 Views