सोलापूर, करमाळा :- करमाळा डॉ प्रचिती पुंडे यांचे करमाळा तालुक्यातील पुंडे हाॅस्पीटल हे प्रसिद्ध आहे. त्या डॉक्टर असुनही त्यांना समाजसेवेची आवड आहे. अनेक दिवसापासून समाजसेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले आहे. अशा समाजसेविका डॉक्टर प्रचिती पुंडे यांना २०२०-२१ चा मिस इंडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. करमाळ्यामध्ये त्यांचे अभिजीता हस्त कला केंद्र चालू आहे या केंद्रामार्फत महिला व किशोरी मुलींकरीता उन्हाळी शिबीर घेतले यामध्ये त्यांनी कळी उमलताना शिबीर, हस्तकला प्रशिक्षण, स्त्रीयांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबीर, असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी ते पुण्यात जावुन तेथे ही बंजारा डिझायनरचे काम चालू आहे. त्या अभिजीता हस्त कला केंद्रांच्या दिग्दर्शक आहेत. डॉ प्रचिती पुंडे या पुण्यात जाऊन मिसेस इंडिया व मिसेस युनिव्हर्स या ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित झाल्या, तसेच मिसेस टॅलेंट म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. जगातील अनेक वृत्तपत्रामध्ये त्यांची बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्या जगभर प्रसिद्ध झाल्याचं गुगलवर देखील दिसतात. डॉ प्रचिती पुंडे यांचे कार्य करमाळा तालुक्यातील इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. त्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपली आवड जोपासुन, त्यांची समाज्याबददलची ओढ कायम राहणार आहे असे त्यांनी मनोगतात सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व मास संघटना जिल्हा अध्यक्षा आशाताई चांदणे, सातबारा न्युज एक्सप्रेस च्या पत्रकार तथा मानव संरक्षण समिती करमाळा तालुका अध्यक्षा विजयाताई कर्णवर, उपाध्यक्षा अनिता कांबळे, अभिजीता हस्त कला केंद्राच्या मॅनेजर नंदिनी लुंगारे, पत्रकार श्रीमंत दिवटे, संतोष दिवटे, संजय कांबळे, आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने २०२०-२१ च्या मिस इंडिया डॉ प्रचिती पुंडे यांचा सन्मान
467 Views