KINWATTODAYSNEWS

दिनकर दहिफळे यांनी किनवट टुडे न्युज ची दखल घेत मातंग स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम केल्याबद्दल मातंग समाजासह सर्व नागरिकातून कौतुकाचा वर्षाव

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)

बोधडी जिल्हा परिषद सर्कल मधील चिखली बु गणा मध्ये मातंग समाजाच्या नागरिकांना समशान भूमीमध्ये प्रेताचा अंत्यविधी करण्यासाठी व प्रेत घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रेत चक्क नाल्यातून घेऊन जात असल्याची बातमी किनवट टुडे न्युज मध्ये प्रकाशित होताच दुसऱ्याच दिवशी सकाळी दिवंगत जिल्हा परिषद सदस्य स्वर्गवासी सुनंदाबाई दहिफळे यांचा मुलगा व सर्कल मधील अप्रतिम नेतृत्व दिनकरदादा दहिफळे यांनी सकाळी ठीक 8 वाजता सदर घटनेची माहिती घेऊन सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या कुठल्याही आदेशाची वाट न पाहता स्वखर्चाने मातंग समाजाच्या समस्या कायमस्वरूपी दूर करण्याच्या हेतूने जेसीबीच्या साह्याने प्रथम 250 मीटर रस्ता साफ केला.
यानंतर सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करणार असल्याचे उपस्थित समाज बांधवांना आश्वासन न देता शब्द दिला असल्याने समाज बांधवां सोबत ईतरही समाजाने दिनकरदादा दहिफळे यांचे कौतुक केले. या कार्यामुळे भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये मातंग समाजाने सुद्धा केलेल्या कार्याबद्दल खंबीरपणे सोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमालीचा बदल दिसणार आहे एवढे मात्र निश्चित. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुक्रम चिखलीकर, टिपू सुलतान चे सामाजिक कार्यकर्ते शेख शाहिद, भुमन्‍ना कोलेपकवार, बालराज कलपेल्लीवार , ऊशन्‍ना मशिदवार, दुर्गादास मोकेनवार आधी समाज बांधव उपस्थित होते.

309 Views
बातमी शेअर करा