KINWATTODAYSNEWS

पोलिस ठाण्याच्या प्रांगणात न्यायाधीश श्री.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर सम्पन्न

किनवट, दि.२३ : तालुका विधी सेवा समिती व व अभिवक्ता संघाच्या वतीने पोलिस ठाण्याच्या प्रांगणात आज(दि.२३) न्यायाधीश श्री.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्री. परवरे,पोलिस निरीक्षक मारोती थोरात,तालुकाविधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, एड.राहुल सोनकांबळे, एड.मिलिंद सर्पे, एड.शामिले यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विधी सेवा समितीचे सदस्य एड.दिलिप काळे यांनी केले.अभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी केले.


मंचावर महिला दक्षता समितीच्या सदस्या भावना दिक्षीत, एड.तौफिक कुरेशी, नायब तहसीलदार रफिक, एड.किशोर मुनेश्वर, एड.रुपेश पुरुषोत्तमवार,एड.राठोड,मुख्य पोलिस जमादार आप्पाराव,एड.सुनिल येरेकार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमास पत्रकार विजय जोशी, विशाल गिमेकार यांच्यासह पोलिस पाटील,सरपंच ,पोलिस कर्मचारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री.मिसलवार,सेवक शौकत शेख व श्री.पठाण यांनी पुढाकार घेतला.

97 Views
बातमी शेअर करा