KINWATTODAYSNEWS

कापसाच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीच्या आवळल्या मुसक्या ;२१ किलो वजनाचे १७ झाडे असा एकूण ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.20.जिल्यातील बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतकऱ्याने कापसाच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या बिलोली तालुक्यातील कांगठी येथील शेतकऱ्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या असून.२१ किलो वजनाचे १७ झाडे असा एकूण ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने कायवाई केली असल्याने असल्याने रामतीर्थ पोलीसांचे पितळ उघडेक्षतर पडलेच आहे पण कारभाराबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.

बिलोली तालुक्यातील कागंठी येथील शेतकरी व्यंकट गंगाधर नरवाडे यांनी आपल्या उतरेस जवळपास २३ कि.मी. अंतरावरील गट क्रमांक ३०४ मधील शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली.सदर प्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरिक्षक आशिष बोराटे यांना दिल्या.बोराटे यांनी मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान पथकासह कांगठी येथे थेट शेतातच धाड मारली.यावेळी नरवाडे यांच्या शेतात हिरवट रंगाची लहान मोठी १७ झाडे दिसली.

हि सर्व झाडे जप्त करुन त्याचे वजन करण्यात आले असता २१ किलो ५५० झाले असून त्याची बाजारातील किमत ८६२०० आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपींनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याचा भंग करुन विना परवाना व बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी कापसाच्या शेतात गांजाची १७ झाडे लावून त्याची जोपासना केल्याचे आढळून आले.त्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.या घटनेचा पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.जाधव हे करत आहेत.

यापूर्वी कुंटूर पोलीस ठाण्यात हद्दीत राहेर येथेही एका शेतकऱ्यांने अशीच वांग्याच्या पिकात गांज्याची शेती केली होती त्यावेळीही स्थानिक गुन्हे शाखेनेच कायवाई करुन आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला होता.

कालही स्थानिक गुन्हे शाखेनेच कारवाई केल्याने स्थानिक पोलीस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेल्या सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या कारभाराबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

237 Views
बातमी शेअर करा