किनवट ता प्र दि १९: तालुक्यातील तेलंगना राज्याच्या सिमावर्ती भागात व किनवट शहरातील तेलगु भाषिक नागरीकांव्दारे साजरा होणारा बोड्डेम्मा हा सण उत्साहात संपन्न झाला, बोड्डेम्मा उत्सवाला तेलगु भाषिक महिलांव्दारे मोठ्या उत्सहात साजरे केले जाते हा उत्सव सुमारे १० दिवस चालतो या दरम्यान महिला आपल्या घरा समोर पारंपारीक पध्दतीने बोड्डेम्मा म्हणजे गौराई व देवी पार्वतीची पुजा अर्चा करतात ज्या मध्ये घरातील अंगणामध्ये पारंपारीक गिते गाऊन देवीची आराधना केली जाते.
या दरम्यान महिला ह्या दहा दिवस एकमेकांच्या अगंणात गोळा होऊन प्राकृतिक पध्दतीने देवीची मांडणी करतात व त्याची पुजा अर्चा झाल्या नंतर वेगवेग़ळे पारंपारीक खेळ खेळले जाताता व उत्सहात गिते ही गायली जातात. सुमारे दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारे आनंदात साजरे केलेल्या उत्सहानंतर म्हणजे दुर्गा विसर्जनाच्या एक दिवस नंतर देवी गौराई चे म्हणजे तेलगु मधुन बोड्डेम्मा असे संबोधले जाते तीचे भव्य मिरवणुकीव्दारे विसर्जन केले जाते. या भव्य विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला आपल्या हातामध्ये फुलांनी सजवलेली फुलांची आरस हि बोड्डेम्माची प्रतिकृती तयार करुन तीचे प्रतिकात्मक विसर्जन करतात ज्यामध्ये परिसरामध्ये उपलब्ध विविध झाडावरील पिवळ्या रंगाच्या फुलांना विशेष महत्व असुन पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर करुन बोड्डेमाचा आरस उभारला जातो व त्याचे विसर्जन केले जाते. किनवट शहर व तालुक्यात तेलगु भाषिकांची संख्या सुमारे ७० हजारांच्या जवळपास आहे त्यामुळे या उत्सहा दरम्यान मोठा उत्साह निदर्शनास येतो व महिलांसह पुरुषही या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात.
तरी किनवट शहरातील विठ्ठलेश्वर मंदिर परिसर, राम नगर, वेलमापुरा, साठेनगर, बालकोंडा, भगतसिंग नगर, बेल्लोरी, गंगानगर, सरस्वती विद्या मंदिर परिसर, धोबी गल्ली, लोहार गल्ली, मामिडगुडा येथिल महिलांनी आपआपल्या परिसरातील महिलांना घेऊन बोड्डेमांची मिरवणुक काढल्याने शहरात बोड्डेमाच्या उत्सवाचे प्रमाण प्रचंड असल्याचे निदर्शनात येत होते. यावेळी नगर परिषदेने विसर्जन घाटावर व्यवस्था केली होती.
किनवट शहरातील तेलगु भाषिक नागरीकांव्दारे साजरा होणारा बोड्डेम्मा हा सण उत्साहात संपन्न
439 Views