KINWATTODAYSNEWS

2005 पूर्वीच्या शिक्षकांची बंद झालेली जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा -सतिष राऊत

नांदेड/प्रतिनिधी: महाराष्ट्रामध्ये 2005 च्या नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. परंतु ज्यांची नियुक्ती 2005 पूर्वी आहे त्या खाजगी शिक्षकांना यात गोवलेले आहे, तेंव्हा ती पुनश्च चालू करण्यात यावी अशी महाराष्ट्रातील जुनी पेन्शन लागू न झालेल्या तमाम शिक्षकाकडून अनेक वर्षापासून मागणी सतिष राऊत किनवट यांनी केली आहे.

यासाठी शिक्षकांनी मोर्चे काढून अनेक वेळेस आंदोलने ही केली आहेत. परंतु जुनी पेन्शन योजना अद्याप लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मनात सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे.

भाजप मित्रपक्ष सत्तेत असताना याच सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी 2019 मधील पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तर काळा दरम्यान तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे, व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलेले प्रश्न होता की 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर अनुदानावर आलेले किंवा असलेले शिक्षक पेन्शन योजना बंद करण्याच्या आधी लागलेल्या शिक्षकावर अन्याय होत आहे. तसेच 2005च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व खात्यां मध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे, परंतु खाजगी शिक्षण विभागामध्ये ते लागू नाही. ही बाब शिक्षकावर अन्याय कारक आहे. असे मत दस्तुरखुद्द अजित पवार यांनी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात मांडले होते.त्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे.

त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित दादा पवार यांनी सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू करावी अशी सर्व शिक्षकांचे माफक अपेक्षा आहे. जर या दिवाळीत जुनी पेन्शन योजना लागू केली तर सर्व कर्मचारी खुश होतील व आपणास आशीर्वाद देतील यात शंका नाही. परंतु हे सर्व करण्यासाठी शेवटी संपूर्ण मंत्रिमंडळाची इच्छाशक्ती महत्वपूर्ण आहे.

अजून एक गंभीर बाब ती अशी की राज्यातील तत्कालिक,विद्यमान, मृत,सर्व आमदारांना ही पेन्शन योजना लागू आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे केवळ पाच 5 वर्ष कार्यरत असतात,शिक्षक मात्र 32,33 वर्ष कार्य करीत असतो,हे फार खेद जनक आहे,असो तरी मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी ही शिक्षकांची मागणी मान्य करतील, अशी आशा बाळगत आहेत.

196 Views
बातमी शेअर करा