KINWATTODAYSNEWS

माहूरगडचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार . आ. रोहित पवार

श्रीक्षेत्र माहूर (प्र.पद्मा गिऱ्हे ) प्रथमताच माहूरगडावर आलो असून या पवित्र भूमीच्या तपोबलाची अनुभूती आपण अनुभवली आहे.या तीर्थक्षेत्राचा विकास कोरोनाच्या कारणामुळे मागील दिड वर्षात रेंगाळल्याचे मान्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे मार्गदर्शनात रखडलेला विकास मार्गी लावण्याचे अभिवच आ. रोहित पवार यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्या नंतर जि. प. सदस्य समाधान जाधव यांचे संपर्क कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करतांना दिले.
श्री रेणुकामातेच्या दर्शना निमित्त आ. रोहित पवार हे सोमवार दि.18 ऑक्टो. रोजी स.11वा.माहूरगडावर आले होते. मंदिरात जाऊन त्यांनी श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन महाआरती केली.लगेच संस्थान कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काणव व दुर्गादास भोपी यांनी आ. रोहित पवार यांचा सत्कार केला.त्यानंतर माहूर शहरातील समाधान जाधव यांच्या रा. काँ. कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्षा शितल जाधव, जि. प. सदस्य समाधान जाधव,तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती मारोती रेकूलवार, प्रा. भगवानराव जोगदंड, वेदांत जाधव यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

259 Views
बातमी शेअर करा