KINWATTODAYSNEWS

शेतकरी विरोधी कायद्या विरोधात “किनवट येथे रेल रोको आंदोलन” लखिमपुर घटणेचा रेल रोखत केला निषेध.

किनवट/प्रतिनिधी: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी तथा दिल्ली येथे दहा महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आसलेले शांततापूर्ण आंदोलनाच्या मागण्या माण्य करण्यात याव्या,तथा लखिमपुर उ.प्र. येथे शेतकऱ्यांना अमानुष चिरडणार्या दोषिंना कठोर शिक्षा करा.या मागण्यासाठी देशभर संयुक्त किसान मोर्चा च्या नेतृत्वात देशव्यापी रेल रोको आंदोलनांची हाक देण्यात आली होती. सरकारच्या दडपशाहीचा शेतकरी जबरदस्त प्रतिकार करण्यासाठी आज देशव्यापी रैल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
अखिल भारतीय किसान संयुक्त मोर्चा ने दिलेल्या देशव्यापी रैल रोको आंदोलनाच्या पाश्वभुमीवर आज किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे ,काॅ.प्रभाकर बोड्डेवार यांच्या नेतृत्वात रैल रोको करण्यात आले.
मोदी सरकारने केलेल्या तिन काळे कृषी कायदे परत घ्या,हामीभाव हामी खरेदी चा कायदा करा, देशाची संपत्ती भांडोवलदारांना विकने थांबावा,लखिमपुर घटणेच्या दोषींना कडक कार्यवाही करा, मागण्यांना घेऊन किनवट रेल्वेस्थानकावर आदिलाबाद मुंबई एक्सप्रेस थांबविण्यात आली. या वेळी मोदी सरकारच्या देश विरोधी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तथा हे तिन्ही काळे कायदे परत घेऊन, हामीभाव आणि हामीखरेदी कायदेशीर करा हि मागणी करण्यात आली.

हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांना मरनाच्या दारत उभे करण्याचे षंडयंञ आहे,या देशातील शेतकरी एकजुटीने परतून लावतील असे मत बोलतांना काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
या रैल रोको आंदोलनात किसान सभेचे काॅ.अर्जुन आडे , काॅ.जनार्दन काळे, काॅ.नंदु मोदुकवार,काॅ.मोहन जाधव, यल्लया कोतलगाम,प्रदीप जाधव, काॅ.स्टलीन आडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

801 Views
बातमी शेअर करा