KINWATTODAYSNEWS

भास्करराव पाटील खतगावकर ,ओमप्रकाश पोकर्णा, सह अनेकांचा भाजपाला दे धक्का

नांदेड/ सुर्यकांत तादलापुरकर: नांदेड मध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नांदेडकरानां पाहण्यास मिळाले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सुरजीतसिंग गिल ,यांच्यासह अनेक सहकारी पदाधिकारी यांनी संयुक्तरीत्या भारतीय जनता पार्टीला राजीनामा देऊन राम राम केले .
लगेच अशोक चव्हाण यांच्या साक्षीने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आहेत यांच्या या काँग्रेस पक्षाच्या घर वापसीने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा उत्सव पाहावयास मिळाला असे काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आपला आनंद उत्सव केला
खतगावकर यांना भारतीय जनता पक्ष सोडण्याचे कारण विचारले असता त्यांनी स्पष्ट रित्या वरिष्ठाकडे लेखी स्वरूपात आम्ही रीतसर पणे आमची नाराजगी व्यक्त करून निवेदन केले आहे.
भारतीय जनता पार्टी चे वरिष्ठ नेते यांच्याकडे आमच्या संयुक्तरीत्या सहीचे राजीनामे देऊन पत्रकार परिषदेद्वारे पक्ष सोडल्याचे जाहीर केले आहे व आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आहे.याबाबत भास्करराव पाटील खतगावकर यांना भाजप सोडण्याचे कारण विचारले असता त्यांनी असे म्हणाले की मी भाजपातील पदाधिकाऱ्यांन वर कुठल्या प्रकारे टीका टिपणी करणार नाही असे खतगावकर म्हणाले
याबाबत जनतेमध्ये शंका अशी निर्माण झाली असावी की देगलूर बिलोली मतदार संघामध्ये भास्करराव पाटील खतगावकर यांनी सुचवलेल्या उमेदवारास तिकीट न दिल्यामुळे कदाचित भास्करराव पाटील खतगावकर हे नाराज झाले असावेत कारण त्यांना भाजपाकडून सुभाष साबणे हा उमेदवार नको होता की काय त्यामुळेच भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह सर्व खतगावकर चाहते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संयुक्तरीत्या भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. असे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे .
भास्करराव पाटील खतगावकर यांनी असे सुद्धा बोलण्यास विसरले नाहीत की मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघांमधून काँग्रेस पक्षाच्या वतीने उभे असलेले उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा विजय निश्‍चित असून काही घाबरण्याचे कारण नाही असे ते म्हणाले नक्कीच भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे आणि देगलूर बिलोली मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून उमेदवार उभे असलेले सुभाष साबणे यांचा पराभव निश्चित असल्याचे असे हि राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे . देगलूर बिलोली मतदारसंघांमधून जनताजनार्दन कौल कोणास देईल हे आता पाहणे महत्वाचे आहे .

245 Views
बातमी शेअर करा