KINWATTODAYSNEWS

किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा परिसरात मुसळधार पाऊस;10 पैकी 2 शेळ्या गेल्या वाहून.

किनवट (प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील बेल्लोरी धानोरा परिसरात काल पाच ते सहा च्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ओढे-नाले पुराने वाहत होते. धानोरा तांडा येथील शेतकरी रोहिदास सिताराम आडे हे आपल्या शेळ्या करण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता, तो शेतकरी सायंकाळी सहाच्या दरम्यान शेळ्या घेऊन आपल्या घराकडे येत असताना तानड्या लगत असलेल्या नाल्याल पूर आला होता. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या 10 शेळ्या वाहून जात होत्या त्यापैकी आठव्या सुखरूप बाहेर निघाल्या पण दोन शेळ्या पाण्यात वाहत वाहत जाऊन मरण पावले आहेत.त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळजवळ वीस हजाराचे नुकसान झाले आहे. या पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पाळीव प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या गरीब शेतकऱ्याची गुजरान या शेळी पालन ला वरच आहे पण यांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे त्याची तहसील प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते, प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी पंचनामा केला. तलाठी सुभाष आडे यांनीही ही बाब पंचनामा याद्वारे तहसील प्रशासनाला कळविली आहे. या शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

207 Views
बातमी शेअर करा