KINWATTODAYSNEWS

दसऱ्याच्या मुहूर्तावर पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिले तीस लाखांचे सोने

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16.दसऱ्याच्या दिवशी सोने देण्याची पध्दत आहे. आपट्याच्या पाणांच्या रुपात हे सोने दिले जाते.पण पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कांही लोकांना दसऱ्याच्या दिवशी त्यांच्याकडून बळजबरीने चोरले गेलेले आणि दरोडा टाकून नेलेले 29 लाख 46 हजार 424 रुपयांचे सोने त्यांना परत दिले आहेत.

15 ऑक्टोबर या दसऱ्याच्या दिवशी हा सर्व प्रकार घडला. पोलीस अधिक्षक कार्यालयात कांही लोकांना बोलवण्यात आले होते. ज्यांच्याकडून जबरी चोरी, दरोडा असे प्रकार करून त्यांचा ऐवज लुटण्यात आला होता.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत क्रियाशिल पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या पथकाने अनेक गुन्हेगारांना पकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात जबरी चोरी आणि दरोड्यातील ऐवज जप्त केला होता. 15 ऑक्टोबर रोजी बोलावण्यात आलेल्या लोकांचे हे सोने होते.

18 सप्टेंबर 2020 रोजी गणेश सुधाकरराव बोकण यांना चोरट्यांनी मारहाण करून 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे साहित्य चोरून नेले होते. त्यातील 4 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे साहित्य गणेश बोकन यांना परत देण्यात आले.

हडको भागातील वात्सल्यनगर सोसायटीमधून रमेश रामचंद्र दाचावार यांच्या घरातून 24 लाख 44 हजार 350 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल होते. जयसिंग रामसिंग सोळंके हे आपल्या पत्नीसोबत जात असतांना पत्नीच्या गळ्यातील 45 हजार रुपयांचे मनीमंगळसूत्र तोडून नेले होते.या सर्व चोरींच्या घटनांना सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वंभर कासले, पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार यांनी चोरट्यांना शोधले. त्यातील रमेश दाचावार यांच्या घरातील 10 तोळे सोने पैकी 7 तोळे सोने जप्त करण्यात आले.

अशा तीन प्रकरणांमध्ये एकून जप्त करण्यात आलेले 29 लाख 46 हजार 424 रुपयांचे सोन्याचे साहित्य तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.याप्रसंगी इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिद्धेश्वर भोर हे उपस्थित होते

82 Views
बातमी शेअर करा