*किनवट*, ता.१४ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात आज(ता.१४)उत्साहात साजरा करण्यात आला.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात संपन्न झाला.डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वज वंदन झाले.दोनही ठिकाणी सामुहिक बुद्ध वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील, अनिल उमरे व गंगाधर कदम यांनी घेतली.
यावेळी रिपाइं मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक,डॉ. यु.बी.मोरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राज्य सचिव एड.मिलिंद सर्पे, उत्तम कानिंदे,विवेक ओंकार,नितीन कावळे,एड.जी.एस.रायबोळे,संदिप निखाते,दिलिप पाटील,अंकुश भालेराव,आत्मानंद सोनकांबळे, मल्लुजी येरेकार,विजय नगराळे,नरेंद्र दोराटे,उपश्याम भगत,मंगला कावळे,प्रा.रविकांत सर्पे,गोपले सर,राजाराम वाघमारे,सुभाष राऊत,चंद्रकांत दुधारे,माधव कावळे,सी.एन.येरेकार,डॉ. कावळे,मारोती मुनेश्वर, अनिल येरेकार,गोकुळ भवरे,विजय जोशी,रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर, पोलिस निरीक्षक मारोती थोरात,एड.कांबळे,सुगत भरणे,जीवन लाठे,गोफणे,सुरेश कावळे,दिगांबर मुनेश्वर, भारत कावळे,सोनुले,दया पाटील,वसंत सर्पे, नगरसेवक श्रीनीवास नेम्मानीवार,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,आशिष शेळके,राजेश पाटील,आकाश आळणे,एड.दिव्या पाटील,प्रा.सुबोध सर्पे, एड.सम्राट सर्पे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पोलिस निरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल यशोधरा मुनेश्वर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.