नांदेड जिल्हा प्रतिनिधी :
नांदेड जिल्यातील धर्माबाद तालुक्यात व जिल्यात
प्रधानमंत्री व रमाई घरकुल आवास योजनेतून घर बांधकाम करणाऱ्यानां पाच ब्रास पर्येंत वाळू कोणतीही रायल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी करून तश्या सूचना नांदेड जिल्हाधिकारी व तसीलदार यांना देऊन ही आज परेंत घरकुल लाभार्थीनां मोफत रेती मिळाली नाही.रेतीचे भाव गगनाला भिडल्यामुळे ती त्या भावात घेणे परवडत नसल्यमुळे या गोरगरीब घरकुल योजनेच्या लाभार्थीनी घरकुल बांधकाम करण्यासाठी पूर्वी राहिलेले घर ही पडून टाकून आपला संसार उघड्यावर पाडून घेतले आहे. पण सध्या रेती कमी भावात मिळत नसल्यामुळे येणारा पाऊसाळ्यात या लाभार्थीनां फार मोठया अडचणीला जामोरे जावे लागेल म्हणून मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी तात्काळ जिल्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मोफत रेती देयावी अस्या मागणीचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.संजीवकुमार गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड तथा तसीलदार धर्माबाद यांच्या कडे एका निवेदना मार्फत केली आहे.