महाविकास आघाडीच्या बंद ला समर्थन देत केले माकप आणि भाकपने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.11.उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरधाव वेगातील गाड्या घालून चार शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या व अनेक शेतकऱ्यांना चिरडणा-या भाजपाचे केंद्रीय राज्य गृहमंत्री श्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा अशिष टेनी व त्याच्या गुंड साथीदारांवर कलम 302 नुसार गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व घरेलू कामगारांच्या तसेच सर्वे नं.५६ बी वजीराबाद नांदेड येथील पिडिता जमीन मालक यांना मंजूर झालेला देय मोबदला तात्काळ अदा करावा व पाचव्यांदा मोजणी करण्यात येऊ नये अशा मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीवच्या वतीने देशाचे महामहीम राष्ट्रपती,राज्यपाल यांच्याकडे नांदेड जिल्हा समितीच्या वतीने दि. ११ आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आल्यालेल्या निदर्शने मध्ये करण्यात आल्या आहेत.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कृषी कायदा करा या प्रमुख मागणीसाठी दिल्लीमध्ये मागील दहा महिन्या पेक्षा अधिक काळापासून अखंड आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाचाच भाग म्हणून उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत.
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान कराणा-या उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री व केंद्रीय गृह राज्यमंत्री टेनी हे सभास्थळाकडे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्य मंत्री टेनी यांचा मुलगा श्री अशिष मिश्र टेनी याने व त्याच्या गुंडानी शेतकरी शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर भरधाव गाड्या घालून अनेकांना चिरडून टाकले आहे. त्यात चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजन गंभीर जखमी आहेत.
भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट घटना असून लखीमपूर खेरी येथील आंदोलनातील शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या अशिष मिश्र टेनी व त्याच्या साथीदार खूनी गुंडावर कठोर कारवाई करून भादवि कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, वजिराबाद सर्वे नंबर ५६ बी मधील जमीन मालक अल्का राजीव गुल्हाने यांचा मजूर झालेला देय मोबदला त्यांना देण्यात यावा तसेच यापूर्वी त्यांच्या जमिनीची चार वेळा मोजणी तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या उपस्थितत झाली असून त्यांचे प्रकरण निकाली निगघालेले असताना मनपाचे काही अधिकारी जे अनेक वर्षापासून वशीला लावून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत असे अधिकारी गुल्हाने यांना मोबदला मिळू नये म्हणून प्रयत्नशील आहेत.त्यांची अर्थातच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि नांदेड शहरातील व जिल्ह्यातील सर्व घरेलू कामगारांच्या बँक खात्यावर अनुदान स्वरूपात मंजूर झालेले पैसे वर्ग करावेत ह्या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या राष्ट्रपती,राज्यपाल व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर कॉ.विजय गाभणे,कॉ.ॲड.प्रदीप नागापूरक,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.उज्वला पडलवार,डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर,कॉ.अरूण दगडू,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.पाशा, कॉ.जयराज गायकवाड,कॉ.शेख रफिक,कॉ.शिवाजी फूलवळे,कॉ,गफार,कॉ.सं.ना.राठोड,कॉ.श्याम वडजे, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणा-या गुंडावर कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण देशभरातून होत असून लोकशाहीवरील विश्वास भक्कम दृढ होण्यासाठी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याच्या जोरदार घोषणा आंदोकांनी निदर्शने मध्ये दिल्या आहेत.