किनवट/प्रतिनिधी:
स्नेहलता परशुराम जाधव(कोठारी सिंध) यांच्या मुलीने नुकत्याच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून घेतलेल्या परीक्षेत दिव्य परिश्रम करून प्रशंसनीय यश संपादित केले.
M.P.S.C.पशुवैद्यकीय अधिकारी संवर्ग-1 (L.D.O.–Live Development Officer Class-1 ) म्हणून आँल महाराष्ट्र महिला ओपन रँक-5 ओपन संवर्गातुन निवड झाली आहे. किनवट सारख्या आदिवासी क्षेत्रातून अवघड परीक्षा पास होणे ही बाब खरोखरच सर्वांना आनंद देणारीआहे. आज तिची निवड पशुधन विकास अधिकारी ” गट अ ” L D O – 1 पदी निवड झालेली आहे.
परशुराम जाधव सर आणि त्यांच्या पत्नीनी एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. यांची जिद्द,चिकाटी,संयम आणि संस्कार ह्यामुळे आज सरांचे तिन्ही मुले गोर बंजारा समाजापुढे आदर्श व प्रेरणा ठरलेले आहे.प्रत्येक आई वडिलांना हेवा वाटावा की आपली मुले तरुण झाल्यावर समाजासाठी, कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरली पाहिजे.जाधव सरांनी काळाची पाऊले ओळखून आपल्या मुलांवर योग्य संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देत सक्षम अधिकारी बनवले आहे.
कठोर परिश्रम करून आपल् ध्येय पूर्ण करणाऱ्या डॉ.स्नेहलता जाधव यांच सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.