किनवट प्रतिनिधि / दि / ११ /:माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिक पेरा ही संकल्पना किनवट तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात कृषिकन्या कु.मेघा सटलावार यांनी राबून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे ही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होताना दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विविध योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा यासाठी त्यांना आपली शेतातील माहिती ऑनलाइन भरण्यासाठी व ई पीक पाहणी आपलिकेशन विकसित झाले आहे या आपलिकेशन संदर्भात पाहिजे तेवढी जागृती शेतकऱ्याचं नसल्याने त्यांना ही बाब लक्षात आणून देण्यासाठी व त्यांना भविष्यात या ऑनलाइन पद्धतीचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन म्हणून किनवट तालुक्यातील दूनड्रा या गावी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय नायगाव बाजार येथील कृषिकन्या मेघा गंगना सटलावार यांनी आपल्या गावात ग्रामीण कृषी जागृता कार्यक्रम राबवला या सर्व आपलिकेशन ची माहिती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना करून दाखवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम आपल्या कार्याच्या माध्यमातून करून दिले सदरील ग्रामीण जागृती कार्यक्रम हा कृषी महाविद्यालय नायगाव च्या वतीने चेअरमन प्राध्यापक एस . जि नागणी कर प्राध्यापक अंकुश खांडरे अध्यक्ष प्राध्यापक दुर्गा चाटशे डॉक्टर बी बी रोगे यांच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या मार्गदर्शनामुळेच शेतकऱ्यांना ही माहिती देण्यात आली या ओळी दुंडरा . गावचे सरपंच राम रेड्डी आईट वार व गावातील शेतकरी श्रीनिवाससुंकावार व्यंकट तोटावार मारुती कदम व्यंकट सुटलावार नथु पाटील तुकाराम गेडाम नरसिंग सटलावार आदी सह परिसरातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम गावातील कृषिकन्या कु. मेघा सटलावार यांनी घडवून आनले बद्दल संबंधित उपस्थित गावकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले
माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार -कृषिकन्या कु.मेघा सटलावार चे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
251 Views