KINWATTODAYSNEWS

लोहा तालुक्यात दोन घटनेत वीज पडून दोघांचा मृत्यू

लोहा,/शिवराज दाढेल लोहेकर

परतीच्या पावसाळ्यात विजांच्या कडकडाटात दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असला तरी सततच्या पावसामुळे शेतीचे कामे रखडली आहेत. मागील आठ दिवसांच्या पावसाच्या विश्रांती नंतर सोयाबीन काढणी कामास वेग आला असून शेतकरी शेती कामात गुंतला आहे. दि. 9 रोजी दुपारी मेगगर्जनेसह पाऊस झाला. त्यात शिवारात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने तालुक्यातील दोन घटनेत दोंघांचा मृत्यू झाला.
लोहा तालुक्यात दोन ठिकाणी विजा कोसळून दोन शेतकरी ठार झाले. पहिल्या घटनेत रिसनगाव ता. लोहा येथील पवार कुटुंब सकाळपासून प्रखर उन्ह असल्यामुळे सोयाबीन काढणीसाठी शेतात गेले होते. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन गडगडाट सुरू झाला. कांहीं वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. दरम्यान शेतकरी बालाजी बापूराव पवार (वय 40) यांच्या अंगावर विज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. दुसऱ्या घटनेत आष्टुर ता. लोहा येथील महेपती दत्तराव म्हेत्रे (वय 19) हा तरुण शेताकडे गेला असता त्याच्यावर देखील विज कोसळली त्यात तो जागीच ठार झाला.

525 Views
बातमी शेअर करा