KINWATTODAYSNEWS

ग्रामीण पत्रकार ते स्वीय सहायक बबलु शेख बारुळ कर यांचा जीवन प्रवास ..युवा जीवन गौरव ते कोरोना योद्धा..

कंधार: वयाच्या 20 व्या वर्षी पत्रकार क्षेत्रात पाऊल ठेऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात बबलु शेख यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्तमानपञातुन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात वेगळी ओळख निर्माण केली सबंध वाचकांच्या प्रेरणा मिळवत अखंड सेवा देणारे पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख कंधार तालुक्यात निर्माण केली.
आता उमरी येथील लोकनेते वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचे स्वी य सहायक म्हणून काम पाहत आहेत..
कंधार संरक्षण समिती संघाचा अध्यक्ष म्हणून सतत एक वेळा पदभार सांभाळत आपल्या सर्व सहकारी पत्रकार बंधावसाठी प्रयत्न शिल राहणारे म्हणून परिचित.
अशा या लढवय्या पत्रकाराचा 7 ऑक्टोबर हा जन्मदिवस होय. पुढील कार्याला शुभेच्छा देत माता तुळजाभवानी त्यांना बळ देवो हिच सदिच्छा.

शेख बबलु बारुळकर

जन्म तारीख 7 आक्टोबर 1991

म्हणजेच येत्या आक्टोबर ला 30 वर्ष पुर्ण करून 31 मध्ये पदार्पण करत आहेत.
23 जानेवारी 2012 रोजी नांदेड न्यूज लाईव्ह या वर्तमान पत्राच्या माध्यमातून पत्रकारीतेला प्रारंभ केला.
2012 ते 2016 पर्यंत प्रतिनिधी म्हणुन काम केले आणि
2017 ला माझा नांदेड लाईव्ह या नावाने स्वतःचे web portal काढून आजपर्यंत 800000 लाख दशकापर्यंत पाठवण्यात यशस्वी झाले.
आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात आपली वेगळी ओळख निर्माण करतांना सबंध वाचकांच्या प्रेरणा घेत पञकारीतेला बळ दिले.
नांदेड जिल्हात सर्व तालुक्यात कंधार तालुक्यातील बारु ल या आपल्या जन्म गावाची एक वेगळी ओळख त्यांनी पत्रकारितेतून निर्माण केली आहे.
बबलु शेख म्हणजे एक अजब रसायण च आहे. हो अजब रसायण या करीता म्हणतो की, लहाणपना पासून आजपर्यंत अतिशय सामान्य कुटुंबात जन्म घेऊन स्वतःची जिल्हाभर ओळख निर्माण केली.वडिल शेख आली यांचा व्यवसाय एक छोटीशी दुकान यात त्यांना एम.ए. बि.एड.पर्यंत शिक्षण देऊन पात्र बनवलं….

काम करत असताना कितीही जिम्मेदारी अंगावर पडली. तरी ही या माणसाच्या अंगातील सामाजिक कार्याची भावना , ओढ कमी झालीच नाही.
एवढेच नाही तर आपल्या गावासाठी काही ना काही नवनवीन करता येते का हे आजही त्याच उमेदीने ते काम करतात. बारूळ येथील बेरोजगार तरुणांसाठी त्यांच्या हातांला काम देण्यासाठी त्यांनी तीन तरुणांना खासगी नोकरी लावली…
हे सर्व करत असताना जन सामान्यांची सोशल मीडियावर
व्यथा मांडणारा पत्रकार म्हणुनही त्यांचा मोठा नाव लौकीक आहे व अनेकवेळा न्यायाप्रति अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात तिळमात्र शंका नाही.

खरच ग्रामिण भागात राहुन कोणताही राजकीय वारसा नसताना. कोणतीही राजकीय भुक मनासी नसता , समाजा प्रती प्रांजळ काम करण्याची भावना असणारा हा आणि हाच माणुस असु शकतो.
म्हणुनच मनावेशी वाटते की या माणसाला आजपर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार हे अभिमानास्पदच आहेत.

आजपर्यंतच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.
मूकनायक सेवाभावी संस्था माजरम च्या वतीने दिला जाणारा युवा जीवन गौरव पुरस्कार 2020 ला मिळाला..

2) कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक वेळा कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित करण्यात आले.
आज त्यांचे काम पाहून शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी स्वी सहायक म्हणून आपल्या सोबत घेऊन चालत आहेत….एक पत्रकार आणि स्वीस सहायक एक वेगळी भूमिका साकारत असताना ते आपल्याला पाहायला मिळत आहे.
अशा या संपादक पञकाराला उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या लेखणीची धार अशीच तळपत राहो त्यांच्या हातून चांगली समाजसेवा घडो हीच सद्दीच्या….

शब्दांकन

. विनोद महाबळे
(वृत्तपत्र छायाचित्रकार)

164 Views
बातमी शेअर करा