किनवट (तालुका प्रतिनिधी)
किनवट येथे नगर परिषद आवारातील भारतीय स्टेट बँकेच्या परिसरातील तळीरामांचा उपद्रव वाढला आहे.. बँकेकडून प्रशासनाकडे अनेक तक्रारी किंबहुना मागणी केली आहे की सदर तळीरामांचा वावर थांबला पाहिजे. भारतीय स्टेट बँकेची शाखा किनवट नगर परिषदेच्या आवारात कार्यरत असून, आजमितीस नगर पालिकेचे स्थलांतर झाल्या करणास्तव नगर पालिका परिसर ओसाड पडून आहे.वरील जागेत रात्रीच्या सुमारास तळीरामाणी आपला अड्डा बनवलेला असून रोजसायंकाळी 7 ते 12 च्या सुमारास यथेच्छ
मद्यपान चालत असून बँकेसाठी नियमित डोकेदुखीचा विषय बनलेला आहे.
रोजमितीस बँकेच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून येत आहेत व मद्यअवस्थेत बँकेच्या परिसराचा
मूत्रविसर्जनासाठी सर्रास वापर केला जात आहेत. परिणामी बँकेच्या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंध पसरत आहे. ज्याचा
त्रास बँकेच्या सर्व ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना होत आहे.
तसेच या तळीरामाकडून बँकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. अलीकडील मालमत्तेचे नुकसानीचे छायाचित्रे
सदारच्या पत्रासोबत जोडण्यात आलेले आहेत. बँक वारंवार आपल्या परिसराचे व मालमत्तेचे जतन करण्यात खर्ची पडत
असून वरिष्ठांना उत्तर देणे आम्हास दिवसेदिवस कठीण होत आहे. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा असलेली भारतीय स्टेट बँक बँकेलाच तळीरामाने आपला अड्डा बनवलेला आहे तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी व किनवट तालुक्याचा विकासाचा कणा असलेले भारतीय स्टेट बँक तळीराम “उपद्रव” मुक्त करावे अशी जनसामान्यांची भावना आहे किंबहुना असे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.
याच कारणास्तव बँकेला आपले एटीएम ही बंद ठेवावे लागत असून ग्राहकांची गैरसोय होत आहे. बँकेकडे रात्रीसाठी एकच
सुरक्षाकर्मी असून मद्यप्राशणास अडवणूक केल्यास त्यांचाशी वादाचे प्रमाण वाढत असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे.
उपरोक्त समस्येची त्वरित दाखल घेऊन तळीरामांचा बंदोबस्त करण्यात यावा व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. किनवट च्या आर्थिक विकासाचा कणा समजला जाणारी बँकेच तळीरामाच्या कचाट्यात अडकलेली आहे सदर आर्थिक क्षेत्राला तळी रामाच्या उपद्रव पासून मुक्त करणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.