KINWATTODAYSNEWS

फटाके विक्रीच्या परवाना मिळवण्याकरिता परवानाधारकाला दोन्ही लस घेणे बंधनकारक

किनवट ता.प्र दि ०३ कोरोनां विषाणुच्या प्रादुर्भावा नंतर लसिकरण मोहिम राबविण्यात आली ज्यामध्ये सुरवातीला केंद्र शासनाकडुन नागरीकांना लस उपलब्ध करुन देण्यात दिरंगाई झाल्याने केंद्र सरकार विरोधात नागरीकांनी राण उठवला होता परंतु आता अनेक प्रलोभने देऊन देखिल नागरीक लस घेत नसल्याने शासनाने हळुहळु कठोर नियमाव्दारे लसिकरण मोहिम राबविण्याचे ठरवल्याने लसिकरण मोहिम आपले हात आवळु लागली आहे.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर महसुल विभागाकडुन दिल्या जाणा-या फटाके विक्रीच्या परवाना मिळवण्याकरिता परवानाधारकाला दोन्ही लस घेतल्याचा परवाना सादर करावा लागत असल्याने लसिकरण मोहिम किती महत्वाची आहे यामुळे निदर्शनास आले आहे. यापुढे भविष्यात लसिकरण केलेले प्रमाणपत्र प्रत्येक ठीकाणी लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही दाखल्या करिता लसिकरण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जसे शिधापत्रिकाधारकाला यापुढे राशन मिळवण्याकरिता लसिकरण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे तर ज्या राशन दुकानधारकांनी अजुन हि लस घेतली नाही त्यांच्या दुकान इतर दुकानाशी सलग्न करण्याच्या देखिल विचारात शासन असल्याचे कळले आहे. त्यामुळे राशनदुकानदार व शिधापत्रिकाधारक यांना देखिल लसिकरण प्रमाणपत्र सादर करावा लागणार आहे.
किनवट शहरात ४० ते ४५ परवानाधारक फटाके विक्रीची दुकाने थाटतात तर ६० ते ६५ दुकानदार हे अवैध पध्दतीने दुकाने थाटतात ज्यामध्ये हे सगळे भाजीपाला मार्केट सारख्या रहदारीच्या परिसरात दुकाने थाटतात यामुळे धोका हि उद्भवु शकतो त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरीकांना दिलासा मिळवुन द्यावा अशी अपेक्षा जागृत नागरीक बाळगुन आहेत.

140 Views
बातमी शेअर करा