सेवानिवृत्त म्हणजे वानप्रस्थाश्रमाचा काळ असतो.
सद्गृहस्थाच्या चार आश्रमापैकी तिसऱ्या स्थानाचे हे आश्रम आहे.
यात सद्गृहस्थाने आपल्या खांद्यावरील जबाबदारी मुले, सुना,नातवंडे यांच्यावर सोपवून हळूहळू संसारगृहातून काढता पाय घेऊन आपले सर्वस्व समाजा करीता झोकून देणे होय.
परंतु असे न करता बरेचसे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी घरादाराला चिकटून अनेक प्रश्न आणि समस्येत गिरक्या घेत असतात परिणामी कुटुंबातील संपूर्ण सदस्य वैतागून जातात.
परिपूर्ण ६० साठ वर्ष घरदार, संसार, प्रपंच उपभोगल्या नंतरही सामाजिक बांधिलकी तथा वसा न घेता त्यामध्येच गुरफटलेले असतील तर त्या निवृत्तधारकास अनेक समस्या भेडसावण्याचे नाकारता येत नाही.
सुधारित विचाराचे लोकं (जाती,धर्म) निवृत्तीनंतर वेगळे क्लब, समुह, वैचारिक गृप बनवितात व समाजकारणात स्वतःला झोकून देतात.
पचरूट मात्र, फाजील वाद, बिनबुडाचे राजकारण ,चुगलखोरपणा, गटातटात भांडणं लावणे, खाणे पिणे चंगळ करणे, लेखन वाचन शुन्य, अविचारीपणा, अक्कल दारिद्रीपणा, शुन्य संघटन कौशल्य, खोचक विचार पद्धती अशा अनेक षड्विकृतीत गुरफटलेले असतात.
त्यामुळे निवृत्तीनंतर सुख, शांती, समाधान, चैन,विलास कसा मिळेल.
अशा निवृत्तीनंतर विकृत बुद्धीच्या लोकांचा गृहसंसार वा गृहस्थाश्रम जीवनमान दोलायमान झाल्याशिवाय राहत नाही.
म्हणून सद्गृहस्थाचे निवृत्तीनंतरचे जीवनमान रंजल्या, गांजल्याची, गरीब निराधार, निराश्रितांची सेवा करण्यात गेले पाहिजेत.
शासनाच्या सेवाकाळातील प्रशासकीय कायदे, नियम, धोरण, सेवा सवलती याची अपार माहिती आपल्या समाजातील बंधु बांधवाना पोहोचविली पाहिजे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीचं गाठोड समाजाकरीता, सर्वसामान्याकरीता मौखिक रुपाने खुले केले पाहिजे. जेणेकरून आपल्या सेवानिवृत्तीचे सार्थक होईल.
आपल्या श्रमसाफल्याची व प्रगाढ अनुभवाची चीज होईल.
शेवटी आनंद, समाधान, परिमार्जन हे आपापल्या परीने चौखंदळपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. असे माझे व्यक्तिगत मत आहे.
*शब्दांकन : डाॅ.वसंत भा.राठोड, किनवट.*
*मो.नं. : 9420315409, 8411919665*
———————————————————-