KINWATTODAYSNEWS

पुरोगामी संघर्ष परिषदेचे कराड तहसीलदारना आरक्षणाचे निवेदन

कराड:-बुधवार दि.२९/९/२०२१* पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कराडचे तहसीलदार विजय पवार यांना मातंग समाजाच्या स्वतंत्र पाच टक्के आरक्षणाच्या मागणीचे निवेदन कराडतालुकाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली व पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.प्राचार्य बाळासाहेब साठे, मा संजय साठे जिल्हाध्यक्ष सातारा (ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळाने दिले.
सदर निवेदनामध्ये अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाचा स्वतंत्र ५% टक्के आरक्षण शैक्षणिक, शासकीय नोकरी, औद्योगिक क्षेत्र व राजकीय क्षेत्रात मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणी शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करून ती मंजूर करून घेण्यात यावी अन्यथा राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षा( महिला आघाडी) सौ. लता साठे ,सौ सुकेशिनी साठे कराड तालुका उपाध्यक्षा (महिला आघाडी) आकाश नेटके कराड तालुकासरचिटणीस, अमोल साठे कराड तालुका उपाध्यक्ष ,शंकर साठे, संदीप यादव इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

137 Views
बातमी शेअर करा