किनवट(आनंद भालेराव):
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या किनवट तालुका कार्यकारिणीची दिनांक 22 सप्टेंबर 2021रोजी वंदना मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली. यात किनवट येथील डॉक्टर अशोक चिन्नावार यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली. सदर निवडीबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर अशोक चिन्नावार म्हणाले की, मी एक समाजाचा घटक आहो त्यामुळे मला समाजाची बांधिलकी आहे. आपला समाज एकसंघ कसा राहील या विषयी व समाजातील अडचणी सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला नंदकुमार बिडवई,सदानंद मेडेवार, गोविंदराव बिडवई, किरण वट्मवार, प्रदीप कोकडवार, विजय कुंचनवार, राजेश्वर रायेवार, दिनकर चाडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला तालुक्यातील आर्य वैश्य जवळपास 300 समाज बांधव उपस्थित होते. प्रीती भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमापूर्वी कोरोनामुळे जे समाज बांधव मृत्यू पावले त्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरुवातीला आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी चे पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले.
डॉक्टर अशोक चिन्नावार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड
95 Views