घुघुस/प्रतिनिधी:शहरांमध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करताहेत. खरं तर या प्लास्टिक पिशव्यावर बंदी आणण्यात आली आहे. खरं तर, हा माल तयार होतो कुठून? हा खरा प्रश्न आहे. परंतु सध्या प्लास्टिक पिशवी चा सर्रास वापर होताना दिसत आहेत. याचा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना नाहक सहन त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा सदरील प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्यात यावी. म्हणजे त्या बाजारपेठेत मिळणारच नाहीत. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलच्या वतीने तहसीलदार घुघुस यांना देण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे, तालुका महिला अध्यक्षा सौ सुशीला नारायण डकरे, बुद्ध राज कांबळे, संजय भालेराव ,अभिजीत झाडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
110 Views