किनवट/प्रतिनिधी— सततच्या पावसामुळे बोधडी खुर्द येथिल नागनाथ ज्ञानोबा मुरकुटे या शेतकर्याचे घर पडून नुकसान झाले. २७ सप्टेबरच्या रात्री आठ वाजताचे दरम्यान घरात कोणी नसतांना घर पडल्याने प्राणहानीचा प्रसंग टळला. ग्रामस्थांनी तलाठी कदमांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु ते “नाॅट रिचेबल”च असल्यामुळे मंगळवारीही पंचनामा होऊ शकला नाही.
बोधडी बु.मंडळात अतिवृष्ठीतर झालीच शिवाय पंधरवाड्यापासून सलग पाऊस चालु असल्याने बोधडी मंडळात लहान-सहान घरांची पडझड झाली आहे. अशातच बोधडी खुर्द येथिल नागनाथ ज्ञानोबा मुरकुटे या शेतकर्याचे २७ सप्टेबरच्या रात्री आठ वाजता पूर्ण घर पडून ते बेघर झाले आहेत. शेजारच्या घरात जेवण करत असतांना घर पडल्याने जीवित हानी टळली. ग्रामस्थांनी तलाठी कदमांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागत नाही. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सहकार्य करण्याची मागणी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे यांनी केली आहे.
बोधडी खुर्द येथिल नागनाथ ज्ञानोबा मुरकुटे या शेतकर्याचे घर पडून नुकसान
373 Views