माहुर :दिव्यांगा च्या भावना मा. आयुक्त औरंगाबाद, दिव्यांग आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्यकार्यकारी जि प नांदेड यांना यांना कळविण्यात याव्यात अशा आशया च्या मागण्याचे निवेदन माहुर तहसिलदार यांना संस्थापक अध्यक्ष कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जि.उपअध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांच्याशिष्टमंडळा ने देऊन चर्चा करून निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.
दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना दर महा 1000 रू दर महिन्या ला मानधन दिले जाते त्यात दोन वेळा चहा साठी दुधाचे पाकिट सुध्दा येत नाही. ते कसे जगत असतील याचा विचार सतेत बसलेल्या खासदार, आमदार,मंत्र्यांनी करावा.
मंत्री ज्या गोरगरीब जनतेच्या मतावर सतेत सहभागी होतात त्या दिनदुबळ्याचे कैवारी ही बनावे.
दिनदुबळ्याना मिळणारे एक हजार रुपये तेहि पाच महिने मिळत नाही व अनेक सवलतीसाठी असूनही दिव्यांग वृध्द निराधार यांना शासन प्रशासन जागे करण्यासाठी मोर्चा,धरने,आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने दिव्यांग वृध्द, निराधार रसत्यावर उतरतील यांची प्रशासनाने दखल घ्यावी असे या निवेदनात इशारा देण्यात आला आहे
या निवेदनावर जि. ऊपअध्यक्ष राजु शेरकुरवार ता. अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण , अरविंद राठोड, दादाराव कांबळे,गणेश पवार,खराटे ईत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत .
दिव्यांगाच्या विविध मागण्याचा त्वरित विचार करावा माहूर तहसीलदारांना दिव्यांगाचे निवेदन
731 Views