*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*: नांदेड-लोहा रस्त्यावर काल दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री एक शिवशाही बस डावीकडे कलटली त्यातील, सहा प्रवाशांना दुखापत झाली आहे.
बस चालकाने दाखविलेले प्रसंगावधान आणि त्याठिकाणी असलेल्या जनतेने अत्यंत विद्युत वेगाने बंद केलेला विद्युत पुरवठा मोठ्या कारणांपासून दूर राहण्यात महत्वाचा ठरला.
आज होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्याची माहिती दि. 24 सप्टेंबरच्या रात्री 7.30 नंतर प्रसारीत झाली.या दरम्यान अनेक विद्यार्थी आपआपल्या परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी प्रवासात होते.नांदेड येथून सोलापूरला जाणारी शिवशाही बस क्र. एम.एच. 06 बी.डब्ल्यू 4381 नांदेड-सोनखेड मार्गाकडे निघाली.या रस्त्यावर बऱ्याच जागी काम चालू आहे. ही बस निघाली तेव्हा यात सर्व आसने भरलेली होती आणि काही प्रवासी उभे पण होते.दरम्यान परीक्षा रद्द झाल्याची माहिती आल्यानंतर या बसमधून जवळपास 25 जण विष्णुपूरी येथे उतरले आणि ही बस काहीशी पुढे गेल्यानंतर जानापूरी तांड्याजवळ डावी उलटली.तरी पण बस चालकाने आपले प्रसंगावधान दाखवत कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी भरपूर मेहनत घेतली.बस डावीकडे कलंडली तेव्हा विद्युत पुरवठा करणारी तार तुटली.त्यावेळी या बसमध्ये 30 प्रवासी होते. प्रवाशांपैकी सहा जणांना ईजा झाली आहे.इतरांना तपासणी करून घरी जाण्यास सांगण्यात आले.घडलेल्या घटनेनंतर गावकऱ्यांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने महावितरणचे विद्युत वितरण बंद केले आणि कर्मचाऱ्यांना बोलावून बसवर पडलेली विद्युत तार बाजूला करण्यात आली. घटना पाहणाऱ्यांनी सांगितले,विद्युत तार जेवढ्या लवकर त्या बसपासून वेगळी करण्यात आली,त्यामुळे मोठा धोका टळला आहे.सोनखेड पोलिसांना सुद्धा घटनेची माहिती मिळताच त्याठिकाणी जाऊन मदत केली