KINWATTODAYSNEWS

मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांची त्वरीत सुटका करावी – राजेंद्र शेळके.

किनवट : जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने (ए. टी. एस.) ताब्यात घेतले असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दिले आहे.
राजेंद्र शेळके यांनी निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी यांना राज्याच्या अंतकवाद विरोधी पथकाने जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. कलीम सिध्दीकी यांच्यासह अन्य ४ सहकाऱ्यांना देखील ए. टी. एस. ने चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले असून परंतु अद्याप ही त्यांची सुटका केली नाही किंवा यांच्या अटकेबाबत केंद्र सरकार अथवा पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. मुस्लिम धर्मगुरूंना अटक केल्याबाबत केंद्र सरकार व ए.टी.एस. च्या या मुस्लिमविरोधी कार्यवाही चा आम्ही जाहीर निषेध करतो असे या निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असताना देखील सरकार केवळ मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्ती विरोधात तपास यंत्रणा लावुन भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही अशाच पद्धतीने मुस्लिम समाजाच्या दोन धर्मगुरूंना धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आले होते. राज्यात धार्मिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज नेहमीच पुढाकार घेत असतो. परंतु राज्याची पोलिस यंत्रणा केवळ मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन मुस्लिम समाजावर एक प्रकारे अन्याय करत आहे.
मुस्लिम धर्मगुरू मौलाना कलीम सिध्दीकी हे मुस्लिम धर्मप्रचारक असुन ते समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करतात. त्याचा व अंतकवादी कार्यवाह्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्यामुळे शासनाने मौलाना कलीम सिध्दीकी व त्यांच्या साथीदारांची निर्दोष त्वरीत सुटका करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले.

88 Views
बातमी शेअर करा