KINWATTODAYSNEWS

सारखनी येथे लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 100 नागरिकांनी केले covid-19 लसीकरण

सचिन जाधव/सारखानी दि.25/09/2021

कोविद लसीकरण मोहीम यशस्वीकरणाऱ्या युवक कार्यकर्त्यांचा होणार सत्कार- सरपंच वनमला तोडसाम

खूप खेदाची बाब आहे दुसऱ्या लाटेत दरम्यान अनेकांना जीव गमवावा लागला . आपल्या गावाचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून हा संदेश इतर गावात गेल्यास येथील नागरिक लसीकरण करून घेणार येथील प्रतिष्ठित नागरिक युवक कार्यकर्ते उत्स्फूर्त भाग घेऊन मोहीम यशस्वी होणार त्यांचा ग्रामपंचायच्या वतीने सत्कार करण्यात येणार असल्याची महिला सरपंच वनमला तोडसाम यांनी सांगितले

सारखणी कोविंड लसीकरण करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यावर उपाय म्हणून लसीकरण करून घेणे हाच एकमेव पर्याय असल्याचे आरोग्य विभागांचे सांगणे आहे म्हणून दि.23 सप्टेंबर रोजी बिरसा मुंडा सभागृह येथे विस्सा मंडळाच्या व ग्रामपंचायत च्या पुढाकाराने येथे 100 नागरिकांना लस देण्यात आली
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला सरपंच वनमाला तोडसाम आणि महिला मंडळाचे अध्यक्ष सुनिता भिमराव तोडसाम आणि बिरसा मंडळाचे अध्यक्ष भीमरावजी महाजन व अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष नारायण सांगळे पोलीस मित्र मंडळाचे अध्यक्ष नवीन वाघमारे जय सेवालाल समितीचे अध्यक्ष निलेश चव्हाण ग्रामसेवक संतोष ताडेवार ग्रामपंचायत सदस्य दिनेश आडे अर्जुन पवार रमेश तोडसाम आदी महिला मंडळ व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक व अंगणवाडी सेविका आशा वर्कर मंजुषा गेडाम त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका कटकमवार मॅडम यशोदा मडावी आरोग्य सेवक कळसे काळे मॅडम आदींचा सहभाग होता

123 Views
बातमी शेअर करा