किनवट/प्रतिनिधी
शहरातील भरवस्तीतील साईनगर परीसरातील रहिवाशी क्षेत्रातील नागरिक फर्निचर दुकानातील कर्णकर्कश आवाजाने त्रासून गेले आहेत. गेल्या दोन वर्षापासून नगरपरिषद, पोलीस स्टेशन,किनवट यांना आठ वेळेस तक्रार देऊनही ध्वनि प्रदूषणाच्या बाबत प्रतिबंध केले नाही.
मात्र दिनांकः 28/जुलै/2021रोजी सुदैवाने नगर परीषदने एक पत्र काढले. संबधीत गैरमार्गाने दुकाने चालविणाऱ्या आस्थापना रहिवासी क्षेत्रात मनाई असतांनाही व्यावसायिक स्वरुपाचे फर्निचर तयार करण्याचे आस्थापना चालवित आहात.हे क्षेत्र रहिवासी प्रयोजनासाठी आहे. असे असतांना आपणास व्यावसायिक आस्थापना त्या ठिकाणी चालवीता येत नाही. हि नोटीस पासून सात दिवसाच्या आत व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्थलांतरीत करण्यात यावी अन्यथा आपल्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.
परंतु आज दोन महीने लोटले आहे. कोणतीच कार्यवाही झाली नाही. पाणी कुठे मुरते? याचा शोध अजून लागलेला नाही. या रहिवासी क्षेत्रात, बीपी,शुगर, मायग्रीन सारख्या आजाराने पीडित आहेत. भविष्यात कर्णकर्कश आवाजाने व धुळीने नागरिकांच्या जिवाला काही धोका नाकारता येत नाही.
विद्यार्थीचे आनलाईन अभ्यास करणे अवघड झाले आहेत. या बाबतीत संबंधीत अधिकारी कर्मचारी यांची तक्रार वरीष्ठाकडे करणार असल्याचे या भागातील नागरिकांना कडून सांगण्यात येत आहे.