KINWATTODAYSNEWS

किनवट शहरातील BSNLसेवा कोलमडली;जनतेचे नेट विना कामे खोळंबली;अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष.

किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील बीएसएनएल सेवा पूर्णतः कोलमडली असून नेट अभावी सरकारी कार्यालय, बँक व इतर अनेक कामे अडकून पडली आहेत त्यामुळे खेड्यापाडयातील जनतेला नाहक त्रास सोसावा लागत आहे.या बाबीकडे अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.

रस्त्याचे काम चालू आहे,त्यात B S N L च्या केबल्स तुटत आहेत परंतु वेळातच दुरुस्त न झाल्या मुळे सगळ्या सरकारी कामकाजात व्यत्यय येत आहे.त्यात B S N Lकार्यालय
मधील वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या हाकल्न्याचे काम करीत आहेत.कोणताच वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी राहत नाही.सर्व जन नांदेड हून काम काज पहात आहेत. आणि BSNL ऑफिस तोकड्या कर्मचाऱ्यांत काम चालू आहे.या बद्दल सतीश राऊत म्हणाले की,मी आज पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यास माझे कोणतेही काम झाले नाही,आणि कित्येक जन रेंज ची वाट पहात ताटकलत उभे होते, कुणाला NSC,MIS,TD RD PLI भरायचे होते पण आजही सर्वांना निराशेने वापस जावे लागले, वरून शहरात पोलिसांची भीती कारण 8 ते 11 लॉक डाउन,बाहेर गाव च्या लोकांनी कसे करावे .. यात पत्रकार मंडळीली लक्ष घालण्याची गरज आहे,त्या मुळे जनतेची गैरसोय टळेल.

228 Views
बातमी शेअर करा