KINWATTODAYSNEWS

डोंगरगाव येथे कृषीदुताकडून शेती विषयक मार्गदर्शन

किनवट (ता .प्र .): वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नीत नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल ता. देगलूर येथील कृषिदुत सय्यद अझर नबिसाब याने ग्रामीण कृषि कार्यानूभव कार्यक्रम व कृषि आधारित उद्योग उपक्रम 2021-2022’ अंतर्गत डोंगरगांव ता. किनवट गावातील गणपत बाबुराव वागतकर यांच्या शेतात शेतकऱ्यांना विविध प्रात्याक्षिका द्वारे मार्गदर्शन केले. आधुनिक शेती विषयक अॅप (जसे. प्लॅन्टिक्स, अॅग्रो स्टार, कृषि-इ- निदान इ.) बीज प्रक्रिया, निंबोळी अर्क बनवणे, विविध पद्धतीने तणाचे विल्हेवाट लावणे, ठिबक सिंचन पद्धत, फवारणीचे रसायन तयार करणे, गुरांसाठी चारा प्रक्रिया करणे इत्यादी प्रात्याक्षिका द्वारे गावातील शेतकऱ्याचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्या मध्ये एकात्मिक शेती विषयी जागृकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम होता, त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुळे आर. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. भरडे एस.एस. कार्यक्रम समन्वयक डॉ. अवताडे एस. सी. सरांचे मोलाचे मार्गदर्शन कृषीदुतला लाभले. प्रात्याक्षिक सादरीकरण्याच्या वेळेस गावातील श्री गजानन सोळंके पाटील, गणपत वागतकर, सय्यद जलाल, माधव खरोडे, शेख इकबाल, विजय डवरे, संदिप वावधने, सय्यद फयाज, आकाश मेंढे, ओमगुणवंत वागतकर व इतर शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

333 Views
बातमी शेअर करा