लोकस्वराज्य चा अर्धनग्न मोर्चा जिल्हाधिकाऱी कार्यालयावर धडकला पालकमंत्री, खासदार यांचा भरांडे यांनी चांगलाच समाचा घेतला.
नायगांव (प्रतिनिधी)
—————————-
प्रस्थापिताना मताच्या पेटीतुन हादपार केल्याशिवाय मातंग समाजाला न्याय मिळणार नाही. येणा-या काळात समाजाने आन्याविरोध पेठुन उटले पाहीजे आसे प्रतिपादन लोकस्वराज्य चे प्रमुख प्रा.रामचंद्र भरांडे यांनी केले आहे.
गऊळ येथील सत्योशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पुणश्च सन्माने बसवण्यात या सह विविध मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनी जिल्हाधिकाऱी कार्यालयावर अर्धनग्न विराठ मोर्चा धडकला होता या वेळी ते बोलत होते.या वेळी विस्णू कसभे, शंकर तडाखे, गणपत भिसे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मारोती वाढेकर, गणेश तादलापुरकर, शाम कांबळे, गंगाधर गायकवाड, पंडित वाघमारे, मारोती गायकवाड, रावसाहेब पवार, व्ही.जी. डोईवाड, मनिष कावाळे, शिवा नरगंले, माधव डोम्पले, नागोराव आंबटवाड, व्यकंट सोनटक्के, राजु मळगे, मुकींदर कुडके, संतोष हातावेगळे. आदिची उपस्थिती होती
पुढे बोलताना भरांडे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सन्मानाने बसवा आन्यथा महाराष्ट्रात भर आंदोलन पेटले जाईल त्याला जबाबदार प्रशासन आसेल . जिल्हाधिकारी यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करू शकले नाहीत ते आता आपण पुतळा बसु आसे ही या वेळी म्हणाले.तसेच पालकमंत्री आशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा भरांडे यांनी चांगलाच समाचार घेताच टाळयाचा कडकडाट झाला, समाजबांधवावर खोटे केस मागे घ्या. लाटी हाला करणा-या उपविभागीय पोलीस आधिकारी याच्यावर तात्काळ करावाई करावी आशी मागणी भरांडे यानी आपल्या भाषणात केली आहे.या वेळी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विष्णु कसबे, शंकर तडाखे, मारोती वाडेकर , माधव डोम्पले, राजु मळगे, गंगाधर गायकवाड, आदिची भाषण झाली आहे.
मारोती गायकवाड, रावसाहेब पवार, मनिष कावळे, नागोराव आंबटवाड, शिवा नरंगले,कंधार तालुक्यातील गऊळ येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा बसवलेला पुतळा गावातील काही गावगुडांनी पुतळा हाटवला होता. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आंदोलन, मोर्च, धरणे सर्व महाराष्ट्रात चालु आहेत संबध महाराष्ट्रात चित्र बिघडत चाले आहे पाहाता. जिल्हाधिकाऱी यांनी नांदेड जिल्ह्य़ातील सर्व मातंग समाजाच्या सर्व पदधिकारी याची बैठक घेऊन गऊळ येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सहा दिवसात बसवणार आसे आश्वासन दिले होते. पण तो पुतळा बसवण्यात आला नसल्याने. निषेध मोर्च्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या पासुन लोकस्वराज्य आंदोलनाच्या शकडो कार्यकर्त्यांनी घोषना देत भरपावसात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला . जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या विरोध प्रचड असतोष समाजा निर्माण झाला घोषनाणी परिसर दणाणून गेला होता. मार्चाला हाजारो बांधव उपस्थितीत होते.