*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.किनवट तालुक्यातील सावरगांव तांडा येथे मथुरा लबाण हा समाज मोठ्या प्रमाणात राहातो. हा समाज श्रीकृष्ण जयंती. व गणेशोत्सव मोठ्या सृध्देने हा सण साजरा करत असतात.या गावात काळूबाबा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणरायाची स्थापना केल्या जाते. या गणरायासाठी गणेश मंडळाच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण मानाचा मोदक तयार करून श्रीगणेशाच्या हातावर ठेवला जातो. नित्यनेमाने सकाळी सायंकाळी. मनोभावे आरती केल्या जाते.श्रीगणेश विर्सजनाच्या दिवशी सर्व गावचे नागरिक एकत्र जमून या मानाच्या मोदकाचा जाहीर लिलाव ठेवला जातो.या वर्षीच्या जाहीर लिलावात अनेक जोडप्यांनी भाग घेतला असला तरी अर्जुन रामचंद्र चौफाडे यांनी 21 हजार 500 रुपयांची लिलावामध्ये सर्वाधिक बोली बोलल्याने या वर्षीचा मोदकाचा मान चौफाडे यांना मिळाला आहे.मनोभावे पुजाअर्चना करून हा मोदक सेवन केल्याने जोडप्यास पुत्र प्राप्ती होऊन मनोकामना पुर्ण होते असी येथील नागरिकांची श्रीगणेशावर सृध्दा असल्याने या मानाच्या मोदकासाठी लिलावात बोली बोलण्यासाठी स्पर्धा होत असते.या गावात हि पंरपरा गेल्या दाहावर्षापासुन चालू आहे अशी माहिती येथे येणाऱ्या भाविकांनी दिली आहे.