KINWATTODAYSNEWS

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी मोबाईल वापस करण्यात येणार

किनवट (प्रतिनिधी )अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाइल हँडसेट मध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी मोबाईल वापसी करण्यात येणार असून प्रकल्पांतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांनी बाल विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे मोबाईल सह उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्यावतीने केले आहे
बालविकास प्रकल्प कार्यालयाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की राज्यातील अंगणवाडी केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या लाभाची अद्ययावत माहिती शासनाला प्राप्त व्हावी यासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीसेविकांना मोबाईल वितरित केले होते परंतु मोबाईलमधील तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाडी सेविकांना माहिती देणे त्रासदायक बनले यासंदर्भात शासनाला वेळोवेळी सांगूनही दखल घेत जात नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने शासनाला मोबाईल वापस करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी मोबाईलच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्यावतीने शासनाला 17 /8/ 2021 रोजी पर्यंत मुदत दिली होती तसेच दिनांक 4 /8 /2021 रोजी महिला बाल विकास मंत्री, सचिव व आयुक्तासोबत संघटनेची बैठक झाली मात्र अद्यापही मोबाईलच्या समस्या कायम आहेत त्यामुळे बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शासनाला मोबाईल वापस करण्यासाठी दिनांक 24/ 9 /2021 रोजी दु 2:00 वा मोबाईल वापसी आंदोलन करण्यात येणार आहे बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गतच्या सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाईलसह बालविकास कार्यालया जवळ उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष रेणुका राठोड व सुरेश जाधव यांनी केले आहे

एकदा प्रकल्पाला परत केलेले मोबाईल कोणी कितीही दबाव टाकला तरी परत घेऊ नयेत जोपर्यंत शासन कृती समितीशी चर्चा करून निर्णय घेत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविकांनी मोबाईल घेऊ नये
अशोकराव जाधव जिल्हाध्यक्ष अंगणवाडी संघटना.

847 Views
बातमी शेअर करा