नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
धर्माबाद नगरपरिषद हद्दीतील शंकर गंज भागातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा करणारी गोदावरी नदीची पाईपलाईन असून ही जिर्ण झालेली पाईपलाईन त्वरीत बदलण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर यांनी दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी व नगरपरिषदकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच ही पाईपलाईन बदलली जाईल असे मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी आश्वासित केले आहे.
या बाबत सविस्तर वृत असे की,धर्माबाद तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कंदकुर्ती ते नागपूर जन्मभूमी (डॉ.हेडगेवार) ते कर्मभूमी हा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे.यासाठी पूर्वतयारी चा भाग म्हणून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठे भूमिगत गटार बांधकाम होत आहे.माञ सदर कार्यासाठी खोदकाम करतांना धर्माबाद नगरपरिषदने शहरवासीयांना पाणी पूरवठा करण्यासाठी जी पाईपलाईन टाकली आहे.ते फुटण्याची दाट शक्यता आहे.तसेच ही पाईपलाईन जीर्ण झाली आहे.
त्यामूळे सदर पाईपलाईन बदलण्यात यावी यासाठी शिवसेनेने ०४.०९.२०१९,२८.०८.२०२० रोजी नगरपरिषदेला ४ व १० डीसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन सदर पाईपलाईन मागणी केली होती.
आज शुक्रवारी (ता.१७) कामाच्या ठिकानी नगरपरिषदचे मुख्याधिकारी निलम कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रामकृष्ण गळधर यांना बोलावून घेऊन सदर प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामूळे नागरीकांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक होत आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी,शहरप्रमुख अनिल कमलाकर,उपशहरप्रमुख लखन सौडलू,साईप्रसाद पेकमवार,गणेश जिब्बनवाड, अरुण पाटील,पांडुरंग पांचाळ, पाणीपुरवठा इंजिनियर स्वामी सर,रुकमाजी बोगावार,बाबू केंद्रे, किशन सोनकांबळे, नगरसेवक संजय पवार, माजी नगरसेवक रवि शेट्टी,पत्रकार गंगाधर धडेकर,बाबुराव गोणारकर,विनोद तगडपल्लेवाड, आदी उपस्थित होते.
सदर पाईपलाईन जीर्ण झालेली असून हायवे चे काम करतांना ही पाईपलाईन फुटण्याचा धोका आहे.तसेच या पाईपलाईन वरुन ज्या नागरीकांना नळाचे कनेक्शन दिले आहे.त्यांना ही नाहक ञास सहन करावा लागेल.नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषद सदर भागात नविन पाईपलाईन टाकेल
निलम कांबळे
मुख्याधिकारी,नगरपरिषद धर्माबाद