*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:येथिल प्रगती नगर तरोडा (बु) च्या श्री एकता गणेश मंडळ आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात 380 नागरिकांनी लस टोचून घेतल्या.
लसीकरण शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय पापंटवार,धम्मा कदम,नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे,सखाराम तुपेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. महापालिकेचे उपायुक्त सरदार संधू यांनी शिबिराला भेट दिली.वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाप्रसाद कुटूरकर यांच्या टीमने लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून तरोड्यातील श्री एकता गणेश मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला,त्यास तरोडा उपनगरातील नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला. या शिबिरात एकूण 380 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. या वार्डाचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर सतिश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिर संयोजक धनंजय उमरीकर यांनी लसीकरण शिबिरात सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे धन्यवाद व्यक्त केले.शिबिर यशस्वी होण्यासाठी राजू परदेशी, अशोक दांडगे बंडू देशमुख,राम देशमुख,धनंजय उमरीकर,भूषण मेत्रे ,पुष्कर देशमुख,पंकज मुंडे, गणेश देशमुख,बाळू लामगे,रामेश्वर पवार,श्रीकांत वाघमारे,दीपक रजुळवर,शाम बडोले,कपिल थोन्टे यांनी अथक परिश्रम घेतले.