KINWATTODAYSNEWS

केंद्रामार्फत दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकास तेल,डाळ, साखर व धान्य दया- सुशिलाबाई डकरे

घुघुस/प्रतिनिधी: दिवाळी सणानिमित्त शिधापत्रिकाधारकास तेल,डाळ, साखर व धान्य मिळणे बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कांग्रेस घुघुस तर्फे मागणी करण्यात आली आहे.
कोविड19 या महाभयंकर रोगामुळे तसेच लॉक डाऊन मुळे जनतेची आर्थिक स्थिती मंदावलेली आहे. दिवाळी हा सण प्रत्येक राज्यात उत्साहात साजरा केला जातो यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सर्व शिधापत्रिकाधारकांना तेल, डाळ ,साखर व धान्याचे वाटप करावे जेणेकरून हा सण गरीबही आनंदात साजरा करु शकतील अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेल घुगुस चे तालुका अध्यक्ष नारायण डकरे, सुशिलाबाई डकरे ता.अध्यक्ष (महिला) यांनी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर केले आहे.

165 Views
बातमी शेअर करा