किनवट/ प्रतिनिधी (ग्राऊंड रिपोर्ट)
किनवट ग्रामीण रुग्णालय उघडण्याचा सकाळी नऊ वाजता चा टाईम असता डॉक्टर्स उशिरा येतात व वेळ संपताच OPD बंद करतात. तसेच एकाच डॉक्टरवर आलेल्या सहा सातशे रुग्णाचा भार पडत असल्यामुळे बिचाऱ्या डॉक्टरांनाही श्वास न घेता येण्या सारखी गर्दी या ठिकाणी दिसून आली.
सध्या कोरोना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक कार्यक्रम राबवून प्रशासन या रोगाला थांबविण्याचा प्रयत्न असताना उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथेच प्रचंड तोबा गर्दी एकमेकावर पडून रुग्ण डॉक्टर चा उपचार घेण्यासाठी धडपडत आहेत यात तरुण-तरुणी, आबालवृद्ध, लहान लहान मुले यांचे समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या अनेक रोगांनी किनवट शहरात व तालुक्यात थैमान घातले आहे.तालुक्यात ग्रामपंचायत व किनवट शहरात नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत निराशावादी दिसून येत आहेत. त्यामुळे हजारो रुग्ण किनवट च्या प्रत्येक दवाखान्यात गर्दी करताना दिसून येत आहेत. याप्रकरणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन येथील प्रभारी अधीक्षक उत्तम धुमाळे यांच्याशी चर्चा करून सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तरी यात अद्यापपर्यंत काहीच सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे.
आजही सकाळपासूनच या रुग्णालयात तोबा गर्दी होती व रुग्ण एकमेकावर पडून उपचार करून घेण्यासाठी धडपडत होते. एकच तोटावर नावाचा डॉक्टर या ठिकाणी तपासणीचे काम करत होते. OPD च्या वेळेत डॉ.जाधव रुग्णालयात वॉर्ड राऊंड ला होते. भालेराव मॅडम एका कक्षामध्ये होत्या तर धुमाळे सर हे सिडीपीओ येथे कामासाठी गेले होते.शेकडो रुग्ण तपासणी साठी गर्दीत धडपडत होते.
हे अनेक दिवसापासून असे विदारक चित्र असूनही येथील लोकप्रतिनिधी असलेले आमदार, खासदार यांना घाम कसा फुटत नाही? असा प्रश्न रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण एकमेकांना विचारत होते.सध्या सध्या व्हायरल रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येते.सध्या ची वाढलेली रुग्ण संख्या लक्षात घेवून डॉक्टरांचे व गोळ्या औषधांचे नियोजन लावणे गरजेचे आहे.
अनेकांना खोकल्याचे सिरप मिळत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.तसेच या तोबा गर्दी मुले योग्य तपासणी व योग्य औषधीही मिळत नसल्याचे रुग्णांनी बोलून दाखवले.
येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर उत्तम धुमाळे यांना आज सदरील परिस्थिती अवगत करून देऊन या विषयी विचारले असता, “डॉक्टर माझ्य ऐकत नाहीत मीच राजीनामा द्यावे की काय असे मला वाटत आहे” असे ते म्हणाले.
जर अधिकाऱ्याचे डॉक्टर्स ऐकत नाहीत अशा डॉक्टर वर वरिष्ठांनी दाखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी येथील रुग्णांची मागणी आहे.